ऐश्वर्याच्या जागी "ही' असती अभिषेक बच्चनची पत्नी, रिअल लाईफमध्ये आला होता मोठा ट्विस्ट

गोष्ट बिघडली नसती तर आज 'ही' चिमुकली ऐश्वर्याच्या जागी असती, बच्चन कुटुंबाची सून म्हणून नक्कीच मिरवलं असतं, पण हिच्या नशिबी तीन वेळा प्रेमात पडूनही "ते' सुख नाही 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 10, 2024, 08:48 PM IST
ऐश्वर्याच्या जागी "ही' असती अभिषेक बच्चनची पत्नी, रिअल लाईफमध्ये आला होता मोठा ट्विस्ट  title=

या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या काकांच्या मांडीवर रडताना दिसत आहे. जर त्या काळी माशी शिंकली नसती तर आज ही अभिनेत्री असती अभिषेक बच्चनची पत्नी आणि बच्चन कुटुंबाची सून. 

अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या काळात बॉलिवूडवर राज्य केले आहे. विशेषत: या अभिनेत्रीने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अशीच एक अभिनेत्री आहे जिने आपल्या कुटुंबाशी संघर्ष करून इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. इंडस्ट्रीत इतकं नाव कमावलं की, सगळे बघतच राहिले. या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिच्या काकांच्या मांडीवर रडताना दिसत आहे. हे वाचून तुम्हाला ही रडणारी मुलगी कोण आहे याचा थोडासा इशारा नक्कीच मिळाला असेल. 

 या अभिनेत्रीच्या नावाचा अंदाज लावा

आता ही रडणारी मुलगी कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. काका ऋषी कपूर यांच्या कुशीत रडणारी ही मुलगी दुसरी कोणी नसून करिश्मा कपूर आहे.  हा करिश्माचा बालपणीचा फोटो आहे. ज्यामध्ये ऋषी कपूर तिच्यासोबत खेळताना दिसत आहेत तर करिश्मा रडत आहे. कपूर घराण्यातील लेकी किंवा सुना अभिनयाच्या जगात येत नाहीत. असे असतानाही करिश्माने सर्वांशी झुंज देत अभिनयात आपले करिअर घडवले आणि यश मिळवले.

एकट्याने मुलांना वाढवणे

करिश्मा कपूरने तिच्या आयुष्यात खूप वेदना सोसल्या आहेत. करिअरसाठी आधी घरच्यांशी भांडण झालं आणि मग लग्नानंतरही करिश्माच्या आयुष्यात दु:ख झालं. दोघांचे एकमेकांवर इतके प्रेम होते की त्यांच्या लग्नाची तयारीही सुरू झाली. मात्र, हा प्रवास एंगेजमेंटपर्यंतच टिकू शकला. यानंतर त्यांचे नाते तुटले आणि करिश्मा पुन्हा एकदा एकटी पडली.

 लग्न ठरले नाही

करिश्माने 2003 मध्ये संजय कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर करिश्मा संजयसोबत खुश नव्हती. 2016 मध्ये हे जोडपे वेगळे झाले. करिश्माने संजयला घटस्फोट दिला होता आणि त्यादरम्यान त्याच्यावर अनेक आरोप केले होते. करिश्मा आणि संजय यांना दोन मुले आहेत ज्यांना अभिनेत्री एकटीच वाढवत आहे. करिश्माने अभिनयाच्या दुनियेतही पुनरागमन केले आहे. ती अनेक डान्स रिॲलिटी शोज जज करताना दिसत आहे आणि वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही दिसली आहे.