मुंबई : सैफ अली खानशी लग्न झाल्यानंतर करिना कपूर पतौंडी खानदानाची सून झाली आहे.
आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबतीत करिना फारशी बोलली नाही मात्र नुकताच सोहा अली खानच्या पुस्तक प्रदर्शन सोहळ्यादरम्यान तिने एका गोष्टीचा खुलासा केला आहे.
सोहा अली खानच्या पहिल्या पुस्तकाचे मंगळवारी प्रदर्शन झाले. 'द पैरिल्स ऑफ बीइंग मोडरेटली फेमस' अशा पहिल्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
सोहाच्या पुस्तक प्रदर्शनादरम्यान सारी पतौडी फॅमिली उपस्थित होती .
पुस्तक अनावरण केल्यानंतर मीडियाशी बातचीत झाली. त्यावेळेस करिनाला काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा सोहाचं ज्ञान आणि भाषा यांचा आवाका मोठा आहे. त्यामुळे तिच्या समोर मला थोडे नर्व्हस वाटते. अनेकदा मला सैफ आणि सोहाचं बोलणं समजणारच नाही अशी भीती वाटते.
अनेकदा जी माझी स्थिती आहे, त्याचप्रमाणे कुणालाही वाटते अशी माहिती करिनाने दिली. सोहाचे इंग्रजीतील काही शब्द मला ठाऊकच नसतात. त्यामुळे आम्ही तिघे जेवायला बाहेर गेलो तर आम्ही नर्व्हस होतो.