फ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही

Dough Kept in Firdge : तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...

दिक्षा पाटील | Updated: Jan 17, 2025, 02:06 PM IST
फ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही title=
(Photo Credit : Freepik)

Dough Kept in Firdge : आजकाल लोकांकडे वेळ नसतो त्यामुळे अनेकदा लोकं जेवणं बनवण्यासाठी अनेकदा त्याची तयारी आधीच सुरु करतात. त्यातही अनेक लोकं हे रात्रीच किंवा काही वेळ आधीच चपातीचं पीठ हे मळून फ्रिजमध्ये ठेवतात. असं करणं सोयीसकर वाटतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून बनवण्यात आलेली चपाती ही आरोग्यासाठी चांगली असते की नाही. महत्त्वाचं म्हणजे अनेकांसाठी ही सोयिस्कर आणि अगदी लवकर जेवण तयार होणारी पद्धत झाली आहे. आज त्याचे फायदे आणि नुसकसाना विषयी जाणून घेऊया. 

जेव्हा कणिक हे बराच वेळ फ्रिजमध्ये ठेवण्यात येतो. तेव्हा त्यात असलेले कार्बोहायड्रेट आणि इतर पोषक तत्व हळू-हळू रासायनिक रित्या बदलू लागतात. थंडाव्यामुळे कणकेच्या फर्मेंटेशनची प्रक्रिया सुरु होते. त्यामुळे या प्रक्रियेत बॅक्टेरिया आणि यीस्ट निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कणकेची चव आणि त्याची गुणवत्ता देखील बदलते. फर्मेंटेशन दरम्यान, कणकेमध्ये आंबटपणा येऊ लागतो. त्यामुळे चपातीची चव बदलते. त्याशिवाय बराच काळ पीठ फ्रिजमध्ये ठेवल्यानं पोषक तत्व हळू-हळू कमी होऊ लागतात. त्यामुळे शरिराला हवे तेवढे पोषण तत्व मिळत नाहीत. त्याशिवाय पचनासंबंधीत अनेक समस्या उद्भवतात. 

फ्रियमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेचा वापर कसा करावा?

जर तुम्हाला फ्रिजमध्ये कणिके ठेवावंच लागलं, तर काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

1. कणिक हे जास्तीत जास्त 1-2 दोन दिवस फ्रिजमध्ये ठेवा. जेणे करून त्यात कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया हा तयार होणार नाही. 

2. कणिक हे हवा बंद डब्यात ठेवा. जेणेकरून ते खराब होणार नाही. 

3. स्वच्छतेची काळजी घ्या - कणिक मळण्यासाठी स्वच्छ भांड्याचा वापर करा. जेणेकरून बॅक्टेरिया तयार होणार नाही. 

4. फ्रीजमधून पीठ काढल्यानंतर लगेच त्याला चांगल्या प्रकारे मरदून घ्या आणि लगेच चपाती बनवा. 

त्याचे फायदे काय आहेत?

फ्रिजमध्ये असलेल्या कणिकेपासून चपात्या बनवण्याचा एक फायदा म्हणजे खूप कमी वेळात चपात्या बनवता येतात. जर तुम्ही नोकरी करणारे असाल आणि तुमच्याकडे कणिक मळण्यासाठी वेळ मिळत नाही तर हा प्रकार तुमच्यासाठी सुविधाकारक असू शकतो. 

दरम्यान, काही लोकांचं म्हणणे आहे की जर कणिक थोडं फर्मेंट झालं असेल तर चपाती पचायला सोपी असते. कारण फर्मेंटेशनची प्रक्रिया पचनक्रिया सोपी करते. पण ही संधी तेव्हाच मिळते जेव्हा कणिक हे जास्तकाळ ठेवण्यात येत असेल तर आणि त्यात कोणताही आपल्या शरिराला काही हानी होणार नाही असा कोणताही बॅक्टेरिया तयार झालेला नसेल तर. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)