'द कपिल शर्मा' शो साठी कपिलने कोणासमोर जोडले हात ?

'द कपिल शर्मा शो' यशस्वी होण्यासाठी कपिल खूप प्रयत्न करतोय.

Updated: Oct 15, 2018, 04:02 PM IST
'द कपिल शर्मा' शो साठी कपिलने कोणासमोर जोडले हात ? title=

नवी दिल्ली : कॉमेडीकिंग कपिल शर्माचा सध्या वाईट काळ सुरू आहे. कधीकाळी टीआरपीमध्ये नंबर वन असलेला 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' कालांतराने प्रेक्षकांना हसवू शकला नाही. कोस्टार्स सोबतच भांडण, कपिलचा अरेरावीपण अशी कारणंही त्यामागे होतीच. पण आता या सर्वातून सावरून कपिल पुन्हा एकदा भरारी घेण्यास सज्ज झालायं. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे कपिलने सोशल मीडियातून सांगितलं होतं. 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

'द कपिल शर्मा शो' यशस्वी होण्यासाठी कपिल खूप प्रयत्न करतोय. कपिल शर्मा देवीच्या चरणी लीन झालायं. कपिल शर्माने चंदीगडमध्ये मॉ बगलामुखीच्या मंदीरात जाऊन तिचा आशीर्वाद घेतला. 

मॉ बगलामुखीकडे कपिलने नेमकं काय मागितलंय हे केवळ कपिललाच माहिती असावं. असं असलं तरीही पुजाअर्चा करताना कपिल खूप उत्साहात दिसत होता.

यासोबतचं कपिलच्या लग्नाची बातमीही जोर धरतेय.

कपिलचा विवाह ?

कपिल आणि त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ यांचा विवाह  पंजाबमध्ये होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. विवाहाचा कार्यक्रम तब्बल चार दिवस चालणार आहे. यासाठी सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीतल्या अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवम्यात येतेय.

लग्नानंतर कपिल मुंबईतही एका पार्टीचं आयोजन करणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

काही महिन्यांपूर्वी कपिल आपल्या गर्लफ्रेंडसोबत ग्रीसमध्ये सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी गेल्याच्या बातम्या आल्या होत्या.

कपिलनं यापूर्वीही अनेकदा गर्लफ्रेंड गिन्नीबद्दल आपलं प्रेम उघडपणे व्यक्त केलंय. 'गिन्नीला माझी बेटर हाफ म्हणून नका, कारण तीच मला पूर्ण करते... लव्ह यू गिन्नी...' असं ट्विट करत कपिलनं काही दिवसांपूर्वी आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. 

प्रोड्युसर म्हणूनही कपिल लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 'सन ऑफ मंजीत सिंह' हा त्याचा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झालाय.