''स्त्रिया काय वॉशिंग मशीन आहेत का?'' कंगनाचा 'तो' जुना Video झाला व्हायरल

Kangana Ranaut Women Washing Machine Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी कंगनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते आहे. सध्या तिचा एक जुना व्हिडीओ हा व्हायरल होताना दिसतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 13, 2023, 02:05 PM IST
''स्त्रिया काय वॉशिंग मशीन आहेत का?'' कंगनाचा 'तो' जुना Video झाला व्हायरल title=
August 13, 2023 | kangana ranaut old video gets viral when she ask about is woman washing machine

Kangana Ranaut Women Washing Machine Video: कंगना राणावतसाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे कारण यावेळी तिचे तीन मोठे चित्रपट हे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. तिचे Emergency, Chandramukhi 2 आणि Tejas हे मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील गणितं काय असतील याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातून मागील वर्षी तिचा धाकड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत वाईट कामगिरी करून होता. त्यामुळे या तीन मोठ्या चित्रपटांची सर्वांनाच उत्सुकता आहे. तिच्या चाहत्यावर्गांमध्येही या चित्रपटांची क्रेझ आहे.

कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. त्यामुळे तिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी तिचा जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिच्या वादग्रस्त वक्तव्यानं यावेळी पुन्हा तिची चर्चा रंगलेली आहे. या व्हिडीओखाली अनेक संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर काहींनी तिचे कौतुक केले आहे. परंतु नेमकी या व्हिडीओत कंगना काय म्हणतेय चला तर मग जाणून घेऊया. 

हेही वाचा ः सावत्र आईच्या प्रश्नावर सैफ अली खानच्या लेकीनं दिलं असं बेधडक उत्तर की क्षणात कौतुक कराल

सध्या तिचा एक जुना इंटरव्ह्यू मधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती असं म्हणते आहे की, ''स्त्रिया या वॉशिंग मशीन आहेत का? ज्यांना वापरले जाते.'' तेव्हाही तिच्या या वक्तव्यावरून खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा या तिच्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. यात ती म्हणते की, ''जेव्हा एक रिलेशनशिप हे दोघांच्या सहमतीनं असतं तेव्हा प्रत्येकवेळाला असं का होतं की स्त्रियाच या वापरल्या जातात आणि पुरूष हे कायमच मज्जा करतात? हे असं होतंच का? स्त्री ही काय वॉशिंग मशीन आहे का? याला नक्की काय अर्थ आहे? जर एक रिलेशनशिप हे दोघांच्या सहमतीनं सुरू आहे. त्यांच्यात प्रेम आहे तर जर पुरूष फक्त मजा घेऊ शकतो तर स्त्री का नाही?''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

@kanganaranaut_._ या फॅनपेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसतो आहे. तिच्या या व्हिडीओखाली अनेकांनी तिचे कौतुक केले आहे त्यामुळे सर्वांचीच विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या या व्हिडीओची जो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.