'गरोदर आहे म्हणून मी लग्न करणार नाही'

कल्कीचा Unexpected Pregnancy बद्दल मोठा खुलासा 

Updated: Nov 18, 2019, 11:56 AM IST
'गरोदर आहे म्हणून मी लग्न करणार नाही' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कल्की केक्लाने (Kalki Koechlin) काही दिवसांपूर्वीच आपण लग्नाअगोदर गरोदर असल्याचं जाहीर केलं. कल्कीने या अगोदर ही Unexpected Pregnancy असल्याचं सांगितलं होतं.  कल्की सध्या आपल्या गरोदरपणाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून चर्चेत आहे. असं असताना आता तिने आपल्या गरोदरपणाबद्दल आणखी काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

कल्की म्हणते,'सुरूवातीला मला गरोदरपणाचं काही वाटलंच नाही. पण जेव्हा मी पहिल्यांदा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले तेव्हा खूप खास वाटलं.' मिडडेशी बोलताना कल्की म्हणाली की,'कल्कीसाठी ही सुरूवातीला अनपेक्षित गर्भधारणा होत. माझ्यात असे काही खास बदल जाणवले नाहीत. मला हे एका परकीय आक्रमणासारखं वाटलं. माझ्या शरिरातील एक एक गोष्ट शोसली जात असल्याचं मला जाणवत होतं. पण मी जेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले तेव्हा मी खूप उत्साहीत झाले. पहिले तीन महिने खूप खराब होते. पण मी आता पुढच्या महिन्यांकडे आशेने बघतेय आणि जानेवारी तारखेची वाट पाहतेय.'

कल्कीने आपल्या लग्नाच्या प्लानबद्दल देखील सांगितलं,'फक्त मी गरोदर आहे, म्हणून आम्ही लग्नाची घाई करणार नाही. जर कोणत्या कागदपत्रासाठी किंवा बाळाच्या शाळेच्यावेळी गरज वाटली तर आम्ही विचार करू. पण आम्ही आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत. आणि आम्ही कुटुंबाशी प्रामाणिक आहोत. कल्की बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये असून त्याच्या बाळाची आई होणार आहे. कल्कीला नैसर्गिकरित्या पाण्यात बाळाला जन्म द्यायचा आहे. याकरता ती गोव्यात बाळाला जन्म देणार आहे.