Netflix वर 'या' क्राइम-थ्रिलर सिनेमाचा बोलबाला; तीन आठवड्यापासून No.1, वीकेंडला नक्की पाहा!

Netflix Best film : गेल्या काही वर्षात कोरियन नाटक, चित्रपट आणि वेब सिरीज यांच्याकडे पाहण्य़ाचा कल बदलला आहे. तुम्हाला जर क्राइम आणि थ्रिलर सिनेमा (Best Crime Thriller Movie) आवडत असेल तर तुम्ही नक्की नेटफ्लिक्सवरील रेप्टाइल (Reptile on netflix) हा चित्रपट पहायला हवा.

Updated: Oct 21, 2023, 07:58 PM IST
Netflix वर 'या' क्राइम-थ्रिलर सिनेमाचा बोलबाला; तीन आठवड्यापासून No.1, वीकेंडला नक्की पाहा! title=
Reptile Movie become Best Crime Thriller On Netflix

Best Crime Thriller Movie On Netflix : वीकेंड आलाय... ना कामाचं टेन्शन... ना बॉसचा वटवट... वीकेंडला बाहेर जाण्याचा प्लॅन नसेल तर तुम्ही तुमची सुट्टी घरी आनंदात घालवू शकता. कारण नेटफ्लिक्सवर एक धमाकेदार फिल्म आलीये. विकेंडची नाईट एन्जॉय करायची असेल तर गेल्या 3 आठवड्यापासून सात्त्याने नंबर वन असलेला हा चित्रपट तुमचा मुड फ्रेश करून टाकेल. तुम्हाला जर क्राइम आणि थ्रिलर सिनेमा (Best Crime Thriller Movie) आवडत असेल तर तुम्ही नक्की नेटफ्लिक्सवरील रेप्टाइल (Reptile on netflix) हा चित्रपट पहायला हवा.

नेटफ्लिक्सच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये फिल्म रेप्टाइल सतत क्रमांक एकवर असल्याचं नेटफ्लिक्सने (Netflix film) लिहिलंय. त्यामुळे सिनेमामध्ये नक्की आहे काय? असा सवाल अनेकांनी कमेंट करत विचारला आहे. 7 सप्टेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाची कहाणी देखील अंगावर काटा आणणारी आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix Film (@netflixfilm)

कहाणीची सुरूवात अशी होते की, एका युवा रियल इस्टेट एजंटची हत्या होते. त्यानंतर एक जासूस त्याच्या मृत्यूचा छडा लावण्याचा प्रयत्न करतो. शोध घेत असताना त्याला काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा होतो. त्यामुळे त्याचं आयुष्यातील अनेक गोष्टी बदलतात. पापणी देखील लवणार नाहीत, असा हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलाय. ग्रँट सिंगर दिग्दर्शित या सिनेमामध्ये बेन्सियो डेल टोरो, अॅलिसिया सिल्व्हरस्टोन आणि जस्टिन टिम्बरलेक मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

दरम्यान, गेल्या काही वर्षात कोरियन नाटक, चित्रपट आणि वेब सिरीज यांच्याकडे पाहण्य़ाचा कल बदलला आहे. रोमान्सपासून ते रहस्यापर्यंत, हे चित्रपट प्रत्येकाच्या मनाला आकर्षित करतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरियन सिनेमांची क्रेझ वाढत आहे.