चष्मा गेला अन् वजनही घटलं... आमिर खानच्या लेकाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आवाक!

Amir Khan Son Junaid Khan Transformation: आमिर खानचा मुलगा झुनैद खान हा सध्या आपल्या नव्या लुकमुळे चांगलाच चर्चेत आलेला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे त्यातून आपल्या या हटके स्टाईलनंही त्यानं चाहत्यांनी मनं जिंकून घेतले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 1, 2023, 05:21 PM IST
चष्मा गेला अन् वजनही घटलं... आमिर खानच्या लेकाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आवाक!  title=
July 1, 2023 | Junaid khan amir khan son new transformation goes viral on instagram netizens says he looks like chunky pandey

Amir Khan Son Junaid Khan Transformation: आमिर खान आपल्या हटके अभिनयासाठी ओळखला जातो. गेल्यावर्षी आमिर खानच्या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर चालू शकली नाही. त्यावर आमिर खाननं आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. त्यानंतर आमिर खान फारसा चर्चेत दिसला नाही. मध्यंतरी आमिर खान नेपाळला विपश्यना केंद्रात पोहचला असल्याचे समोर आले होते. त्याआधी आमिर खान आणि त्याच्या परिवारानं पूजा केल्यानंतर त्याला ट्रोलही करण्यात आले होते. परंतु आता आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे परंतु यावेळी तो आपल्या लेकामुळे चर्चेत आला आहे. रिना दत्ता आणि आमिर खान यांनी 2002 साली घटस्फोट घेतला होता. त्यांना दोन मुलंही आहेत. आयरा खानचं मागच्यावर्षी साखरपुडा झाला. नुपूर शिखरेसोबत तिचा साखरपुडा पार पडला. 

त्याचा मोठा मुलगा जुनैदही अनेकदा चर्चेत असतो. सध्या त्याची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात त्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यानं आपलं वजन कमी केलं असून त्याचा डोळ्यावरील चष्माही गेला आहे. त्यामुळे त्याचा लुक पुर्णपणे बदलला आहे. त्याचा हा व्हिडीओ आणि फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्याचा यावेळी संपुर्ण लुक पुर्णत: बदलला आहे. सगळेच त्याच्या लुकीची स्तुती करताना दिसत आहेत तर अनेक जण त्याला चंकी पांडे म्हणून संबोधत आहेत. त्याच्या बदललेल्या लुकनंतर तो अभिनेता चंकी पांडेसारखा दिसतो आहे अशी त्याची चर्चा सुरू झाली आहे. 

हेही वाचा - अभिनेत्री अमृता खानविलकरनं कोकणात सुरू केली मासेमारी? Video ठरतोय चर्चेचा विषय

यापुर्वी आमिर खानचा मोठा मुलगा फार वेगळा दिसायचा. त्याच्या डोळ्यावर चष्मा होता आणि त्याचे वजनही अधिक होते. त्याच्या चेहऱ्यावर दाढीही होती. त्यामुळे आता त्याचा बदलेला लुक पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्याच्या या लुकचे अनेक जण कौतुक करताना दिसत आहेत. त्याच्या लुकनं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. सध्या तो एका कार्यक्रमच्या बाहेर स्पॉट झाला आहे. यावेळी तो एका लग्नाला गेला असावा. त्याच्या बाहेर तो स्पॉट झाला होता. त्यावेळी पापाराझींनी त्याला घेरले आणि त्याचा हा पुर्णपणे बदलेला लुक पाहुन चाहत्यांना तर धक्काच बसला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जुनैद खानच्या अफेअरचीही चर्चा रंगलेली होती. सोनल वर्माला तो डेट करत असल्याचीही चर्चा रंगलेली होती. यावेळी पापराझींसोबत पोझ देताना त्यानं आपला चार्म लुक दाखवण्याची एकही संधी सोडली नाही.