'ताली बजाती नहीं, बजवाती हूं'; Sushmita Sen च्या Taali चं मोशन पोस्टर प्रदर्शित

Sushmita Sen Taali movie : सुष्मिता सेनच्या 'ताली' या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटात सुष्मिता ही तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारे त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केला आणि त्यानंतर तृतीयपंथी यांच्यासाठी मदतीचा हात केला. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 1, 2023, 05:16 PM IST
'ताली बजाती नहीं, बजवाती हूं'; Sushmita Sen च्या Taali चं मोशन पोस्टर प्रदर्शित title=
(Photo Credit : Social Media)

Sushmita Sen Taali movie : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. सध्या सुष्मिताचं चर्चेत असण्याचं कारण तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत. लवकरच सुष्मिताची 'आर्या 3' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचं मोशन पोस्टर हे काल म्हणजेच 30 जून रोजी प्रदर्शित झालं. तर दुसरीकडे तिचा 'ताली' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुष्मिता सेन ही गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर सुष्मितानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

सुष्मिता सेननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. या मोशन पोस्टरमध्ये सुष्मिता सेन गौरी सावंतच्या भूमिकेत दिसत आहे. हे मोशन पोस्टर शेअर करत त्यात कॅप्शन दिलं आहे की 'लाख गिरा दे बिजली मुझपे, मैं तो सतरंग बनूं। मैं ताली बजाती नहीं, बजवाती हूं' या चित्रपटाच्या या मोशन पोस्टरमध्ये सुष्मिता जड आवाजात बोलताना दिसते की "मैं ताली बजाती नाही.. .बजवाती हूं."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ताली'मध्ये सुष्मिता सेन तृतीयपंथी गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. गौरी सावंत यांनी त्यांच्या आयुष्यात खूप वेदना आणि दु:खांचा सामना केला, पण आज ती तृतीयपंथी यांच्या मदतीसाठी   काम करत आहे. ती व्यवसायाने एक सामाजिक कार्यकर्ते आहे. गौरी सावंतने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती जिवंत असताना तिच्या वडिलांनी तिला 'मारून टाकले'. खरं तर गौरी सावंत हयात असतानाही तिच्या वडिलांनी तिचे अंतिम संस्कार केले होते.

मराठी कुटुंबात जन्मलेल्या गौरी सावंत यांचे खरे नाव गणेश नंदन होते. तो फक्त सात वर्षांचा असताना त्याची आई वारली होती. त्यानंतर गणेश नंदन यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले. गणेश नंदनला जेव्हा मोठं झाल्यावर त्यांच्या लैंगिकतेची जाणीव झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगण्याचे धाडस करू शकले नाही. त्यातही जेव्हा त्यांनी वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी मान्य केले नाही. त्यानंतर ते घराबाहेर पडले. गणेश नंदन यांनी त्यानंतर वेजिनोप्लास्टी केली आणि कायमसाठी गौरी सावंत झाले. 

हेही वाचा : धक्कादायक! प्रसिद्धीच्या झोतात असतानाच 'या' गायकाने उचललं टोकाचं पाऊल, रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

'ताली' हा चित्रपट जियो सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. अजून चित्रपटाच्या प्रमोशनची तारिख समोर आलेली नाही. पण सुष्मितानं या सीरिजची जेव्हा घोषणा केली आहे. तेव्हा पासून सगळेच चित्रपटासाठी उत्सुक होते. मोशन पोस्टर पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांची उस्तुकता आणखी वाढली आहे. चाहते प्रेक्षकांची स्तुती करत आहेत आणि तिला प्रेक्षक वाघिन म्हणत आहेत. तर 'ताली' या चित्रपटाचे दिग्दर्शन रवि जाधवनं केले आहे.