गर्दीच्या वेळी कर्जत, ठाण्यावरून लोकल ट्रेननं प्रवास केलाय? अभिनेत्रीचं उत्तर ठरतंय चर्चेचा विषय

Marathi Actress Local Train Experience: लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. त्यामुळे ज्यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास केला असेल त्यांच्यासाठी त्यांची अशी एक आठवण तर नक्कीच असेल. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं आपला हा अनुभव सांगितला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 13, 2023, 04:59 PM IST
गर्दीच्या वेळी कर्जत, ठाण्यावरून लोकल ट्रेननं प्रवास केलाय? अभिनेत्रीचं उत्तर ठरतंय चर्चेचा विषय  title=
August 13, 2023 | jui gadkari shares her experience in the local trains traveling for peak hours

Jui Gadkari: मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही लाईफलाईन आहे. येथे दिवसाला लाखो लोकं क्षणाक्षणाला लोकलनं प्रवास करतात. आपल्या ऑफिसपर्यंत जाण्यासाठी आणि ऑफिसवरून परत घरी जाण्यासाठी लोकल आपल्याला सुखरूप घरी पोहचवते. या लोकलट्रेनमधून प्रवास करताना आपल्याला नानाविध माणसं भेटतात आणि सोबतच आपल्याला तऱ्हेतऱ्हेचे अनुभवही येतात. शाळा कॉलेज ते ऑफिसला जाणारे तरूण तरूणी, कुठेतरी लग्नाला जाणारे, कुठूनतरी प्रवासातून आलेले, मित्राच्या घरी जाणारे, पिक्चरला जाणारे असे अनेक जणं आपल्याला या लोकल ट्रेनमध्ये भेटतात. लोकल ट्रेननं प्रवास करताना अशा अनेक लोकांशी आपल्या गाठीभेटी होत असतात. त्यातून Peak Hours ला लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. ही गर्दी इतकी असते की आपल्याला चढणंही मुश्किल होऊन जातं. त्यातून आपल्या प्रवाशांचे धक्केही खावे लागतात. कलाकार हे क्वचितच लोकल ट्रेनमधून प्रवास करत असतील असा आपला समज असतो. 

परंतु सर्वांनीच लोकल ट्रेनमधून एकदा तरी प्रवास केलाच असतो. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं आपला लोकल ट्रेनचा अनुभव सांगितला आहे. कलाकार हे इन्टाग्रामवरून Ask Me Anything चं सेशन करताना दिसतात. तेव्हा चाहते त्यांना नानाविध प्रश्न विचारताना दिसतात. खासकरून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची इच्छा असते. तेव्हा अशाच एका अभिनेत्रीनं आपल्या इन्टाग्राम पेजवरून असंच एक Q & A सेशन भरलं होतं. यावेळी तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यात एका चाहत्यानं तिला लोकल ट्रेनविषयी प्रश्न विचारला होता. यावर अभिनेत्री काय म्हणाली? हे वाचून तुम्हालाही तुमच्या लोकल ट्रेनच्या अनुभवाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

हेही वाचा : रजनीची जादू कायम! 'जेलर'ने केला कमाईचा विक्रम; 3 दिवसांमध्ये कमवले 'इतके' कोटी

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री जुई गडकरीचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. यावेळी तिनं आपल्या चाहत्यांना Ask Me Anything चा प्रश्न विचारला आहे. जुई गडकरी ही 'पुढचं पाऊल' या मालिकेतून प्रेक्षकांमसोर आली होती. या मालिकेनंतर तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. त्यातून त्याआधीही तिनं 'तुजवीण सख्या रे' या मालिकेतून अभिनय केला होता. 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमध्येही ती दिसली होती. सध्या ती 'स्टार प्रवाह'वरील 'ठरलं तर मग' या मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

वाचा पोस्ट : 

यावेळी एका चाहत्यानं तिला विचारलं की, ''मॅम, तुम्ही कधी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून गर्दीच्या वेळेत कर्जत किंवा ठाणे स्थानकावरून प्रवास केला आहे का?'' त्यावर जुई गडकरी म्हणते, ''हो! मला ट्रेनमधून प्रवास करणे खूप सोपे जायचे. मी फक्त उभी राहायचे आणि इतर बायका मला ढकलून मस्त ट्रेनमध्ये चढायच्या…तो अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. आता मला ट्रेनची भीती वाटते. मुंबईत गर्दीच्या वेळेत जे लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात त्यांना मी सलाम करते.''