घटस्फोटानंतर Johnny Depp आणि Amber Heard यांच्यावर अशी वेळ, तुम्हालाही बसेल धक्का

घटस्फोटानंतर Johnny Depp आणि Amber Heard यांच्या सर्वात आवडत्या आणि  बहुमूल्य गोष्टीवर संकट  

Updated: Sep 12, 2022, 12:27 PM IST
घटस्फोटानंतर  Johnny Depp आणि Amber Heard यांच्यावर अशी वेळ, तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : हॉलिवूड स्टार जॉनी डेप (Johnny Depp) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण म्हणजे जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यातील वाद. ही जोडी काही वर्षांपूर्वी विवाहाच्या नात्यातून वेगळी झाली असली, तरीही या नात्यामध्ये धुमसणारी ठिणगी काही केल्या विझलेली नाही. जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एम्बर हर्ड यांच्यामघ्ये सुरु असणारा खटला अखेर निकाली लागला आणि न्यायालयाने अभिनेत्याच्या बाजूने निकाल दिला. 

जॉनीनं एम्बरच्या आरोपांमुळं आपलं झालेलं नुकसान आणि मलीन झालेली प्रतिमा पाहता तिच्याच विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.  ज्यामध्ये काही गंभीर आरोप- प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं. बरेच गौप्यस्फोटही झाले. पण, अखेर न्यायालयानं त्याच्या बाजुनं निकाल देत डेपला मोठा दिलासा दिला. 

आता जॉनी डेप त्याचं आलिशान घर विकत आहे.  जिथे एम्बर केलेल्या हल्ल्यामुळे अभिनेत्याचं बोट कापलं गेलं. जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या या घराची किंमत 40 मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. 

अभिनेत्याच्या घराचा लिलाव 28 सप्टेंबरला होणार आहे. जॉनी डेपच्या या आलिशान घरात 10 लक्झरी बेडरूम, 10 बाथरूम व्यतिरिक्त बरीच मोकळी जागा आहे. 18 हेक्टरमध्ये पसरलेल्या या मालमत्तेत खाजगी विमानांना उतरण्यासाठी हेलिपॅड आणि लँडिंग स्ट्रिप देखील आहे. 

नदीवर फिरण्यासाठी एक खाजगी जेट्टी देखील आहे.  अशी एक बोट आहे ज्यामध्ये 2000 वाईनच्या बाटल्या आणि स्वतःचे खासगी थिएटर आहे. त्यामुळे जॉनी डेप हे आलिशान घर कोण आणि किती रुपयांत विकत घेईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.