'मला म्हणाले तुझं लग्न वर्षभरही टिकणार नाही'; 14 वर्षांच्या सुखी संसारानंतर जितेंद्र जोशी म्हणतो 'मला त्या सर्वांबद्दल... '

Jitendra Joshi On his Marriage : जितेंद्र जोशीनं काल त्याच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर त्यांचा हा प्रवास कसा होता हे सांगितलं तर लग्नाआधी मिळालेल्या एका सल्ल्याविषयी देखील सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 2, 2023, 11:48 AM IST
'मला म्हणाले तुझं लग्न वर्षभरही टिकणार नाही'; 14 वर्षांच्या सुखी संसारानंतर जितेंद्र जोशी म्हणतो 'मला त्या सर्वांबद्दल... ' title=
(Photo Credit : Social Media)

Jitendra Joshi On his Marriage : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी हा त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. जितेंद्र हा छोट्या पडद्यावर, नाटकात, चित्रपटांमध्ये आणि त्या सोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सतत आपल्याला पाहायला मिळतो. इतकं सगळं करत असताना कुटुंबासोबत वेळ व्यथित करण कोणालाही किती कठीण होऊ शकतं याची कल्पना आपल्या सगळ्यांना आलीच असेल. दरम्यान, काल जितेंद्रनं त्याच्या पत्नीसोबत लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तुमचा संसार एक वर्ष ही टिकणार नाही असा सल्ला त्याला कोणी दिल्याचा खुलासा केला असून आता आम्ही 14 वा लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय असं म्हटलं आहे. 

जितेंद्रनं त्याची पत्नी मितालीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यानं पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तो म्हणाला की 'खरंच? 1,22,640० तास? 5110 दिवस? 14 वर्षे? मला अजूनही आठवते की कोणीतरी सांगितले होते की हे वर्षभरही टिकणार नाही. मला त्या सर्वांबद्दल खूप वाईट वाटते कारण तू किंवा मी किंवा ते आपल्यासाठी निर्णय घेत नाहीत तर देव आणि पवित्र ऊर्जा नावाची गोष्ट या जगात आहे. माझा असा विश्वास आहे की एक व्यक्ती म्हणून आपण वेगवेगळ्या कारणांनी बदलत राहतो पण आपला आत्मा तोच राहतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : मराठा आरक्षण आंदोलनावरील लाठीचार्जवर संतापली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री; तिची Insta Story चर्चेत

पुढे जितेंद्र म्हणाले की 'कुठेतरी, कधी कधी आपण कोणाकडून काहीतरी मागतो किंवा शोधतो, किंवा आपण एकमेकांपासून खूप दूर जातो किंवा इतके जवळ येतो की आपण एकमेकांना पाहूही शकत नाही, परंतु ही कर्मशक्ती आहे जी एखाद्या हेतूमुळे कार्य करत आहे. कदाचित तू मला चांगला माणूस बनवणं हाच मला भेटण्याचा उद्देश आहे. मला नेमकी खात्री नाही कारण एक चांगला माणूस होण्यासाठी मला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. सर्व कडवट ते चांगल्या प्रवासाबद्दल धन्यवाद. हे जसं नशिबात आहे तसंच घडूदे. धन्यवाद मिताली. तुला अधिक यश आणि आनंद मिळो. लग्नाच्या 14 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.' जितेंद्रनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याच्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले असून या पोस्टवर कमेंट करत त्या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.