जान्हवी कपूरने कॅमेरासमोरच काढले कपडे; व्हिडिओ व्हायरल

जान्हवी कपूर नेहमी कोणत्या ना कोणत्या काराणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करुन अभिनेत्री तिच्या चाहत्यांना कायम घायाळ करते. 

Updated: Dec 20, 2022, 08:40 PM IST
जान्हवी कपूरने कॅमेरासमोरच काढले कपडे; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बोल्ड अभिनेत्री म्हटल्या की, सगळ्यात आधी समोर येते जान्हवी कपूर. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी जान्हवी कपूर नेहमी कोणत्या ना कोणत्या काराणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करुन अभिनेत्री तिच्या चाहत्यांना कायम घायाळ करते. असेच काही फोटो जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोशूटमध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. याचबरोबर अभिनेत्रीने यावर पांढऱ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे.

जान्हवी चर्चेत येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे, या फोटोत अभिनेत्रीने तिचं जॅकेट काढल्याचं दिसत आहे. कॅमेरासमोरच जान्हवीने तिचं जॅकेट काढलं आहे. तिच्या या बोल्ड अदा पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. कॅमेऱ्यासमोर बोल्ड पोज देत तिने फोटोशूट केलं आहे. तिच्या किलर लूकने इंटरनेटचं तापमान वाढलं आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या ग्लॅमरस लूकची तुफान चर्चा रंगत आहे. 

अभिनेत्रीने या फोटोशूटमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे यावरच तिने एक पांढऱ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे. तिचा हा लूक पुर्ण करण्यासाठी जान्हवीने काळा चश्मा घातल्याचं दिसत आहे. याचबरोबर केस मोकळे ठेवत अगदी हलका मेकअप करुन अभिनेत्रीने तिचा हा लूक पुर्ण केला आहे. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या या फोटोशूटवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहिंनी तिचे हे फोटो पाहून तिला हॉट म्हणत कमेंट केली आहे तर, काहिंनी बोल्ड म्हणत जान्हवीचं कौतूक केलं आहे.

जान्हवी कपूर वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, जान्हवीने इशान खट्टरसोबत 'धडक' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याचबरोबर तिचा 'रुही' हा हॉरर कॉमेडी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. आता जान्हवी कपूर लवकरच 'दोस्ताना 2' आणि 'गुड लक जेरी' मध्ये दिसणार आहे.