गाडीत कपडे बदलताना जान्हवी कपूरचा स्ट्रगल; विचित्र फोटो आला समोर

जान्हवीच्या या फोटोची जोरदार चर्चा 

Updated: Mar 11, 2021, 03:00 PM IST
गाडीत कपडे बदलताना जान्हवी कपूरचा स्ट्रगल; विचित्र फोटो आला समोर  title=

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. आज तिचा 'रूही' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या अगोदर जान्हवीचा एक विचित्र फोटो समोर आला आहे. या फोटोची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. जान्हवीवर अशी काय वेळी? असं म्हणत या फोटोची चर्चा रंगली आहे. 

'रूही' सिनेमाचं प्रमोशन करता जान्हवी कपूर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे. या शहरातून त्या शहरात ती सिनेमाच्या प्रमोशनसाठी फिरत आहे. जान्हवीचं शेड्युल इतकं व्यस्त आहे की, तिला कपडे बदलण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. यामुळे तिने चक्क गाडीतच कपडे बदलले आहेत. महत्वाचं म्हणजे याचा फोटो सध्या चर्चेत आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती चक्क गाडीतच कपडे बदलताना दिसत आहे. 'रूही' सिनेमाच्या प्रमोशननंतर जान्हवीला विमान पकडायचे होते. त्याकरचा ती एअरपोर्टला जाण्याच्या घाईत होती. 

अशावेळी तिला कपडे बदलण्यासाठी वेळ मिळाला नाही. तेव्हा तिने चक्क गाडीतच कपडे बदलण्याचा निर्णय घेतला. प्रमोशनकरता तिने 'स्कर्ट टॉप' घातलं होतं. त्यानंतर तिला जीन्स आणि टॉप घालायची होती. तेव्हा तिने हे फोटो शेअर करत.... आरामदायी दिवस.... असं कॅप्शन लिहिलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी सोशल मीडियावर चर्चेत आहे. जान्हवीचा असिस्टेंट अजीम आणि त्याचा कुटुंबियाला अपकमिंग सिनेमा दाखवला. जान्हवी कपूर आपल्या असिस्टेंटच्या मुलीला घेऊन खेळत असताना दिसत आहे.