दीपिका रणवीरचा 'हा' व्हिडीओ व्हायरल, चर्चा तर होणारच

दीपिका आणि रणवीरने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं.    

Updated: Mar 11, 2021, 02:23 PM IST
दीपिका रणवीरचा 'हा' व्हिडीओ व्हायरल, चर्चा तर होणारच title=

 मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग अनेक वेळा एकत्र मस्ती करताना दिसतात. नुकताच दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हे कपल 'वर्क इट बेबी' या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या दोघांनीही 'बुसीट चैलेंज' सुरु केलं आहे. दोघेही सिनेमांबरोबरच सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह असतात. शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. या व्हिडीओच्या सुरुवातील कलफूल नाईट सूट आणि डोक्यावर हॅट घातलेली दीपिका डान्स स्टेप करताना दिसते.

नंतर रणवीरही तिच्यासोबत डान्स करु लागतो. रणवीरने देखील दीपिकाप्रमाणेच लाल रंगाची टेडी बिअरचं चित्र असलेली पॅण्ट, जॅकेट आणि हॅट घातली आहे. रणवीर सिंह मजेशीर अंदाजात बोल्ड डान्स करताना या व्हिडीओत दिसत आहेत. तर रणवीर नाचत असतानाच दीपिका त्याला धक्का देते आणि त्याला खाली पाडून स्वत: नाचू लागते. या डान्स व्हिडीओमध्ये खूप अतरंगी ड्रेस या दोघांनी कॅरी केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

रणवीर त्याच्या फॅशनसेन्समुळे नेहमीच ट्रोल होत असतो. याचबरोबर अनेकवेळा हे दोघेही अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत आले आहेत.व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने 'वर्क इट बेबी' असं कॅप्शनदेखील दिलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये दीपिकाने पती रणवीर सिंगलाही टॅग केलं आहे. त्यांनी हा व्हिडिओ 'बुसीट चॅलेंज' या हॅशटॅगखाली तयार केला आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल होत आहे की प्रत्येकजण या गाण्यावर डान्स करुन व्हिडीओ शेअर करत आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत १२ तासांत ९ मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. चाहत्यांबरोबर सेलेब्स देखील या व्हिडीओवर कमेंन्ट करताना दिसत आहेत.

लवकरच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या आगामी '83' सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा 1983 मधील भारतीय क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.