'आमच्या दोघांची शरीरं अगदी...'; 'Mr & Mrs Mahi' मधील राजकुमार रावबरोबरच्या इंटीमेट सीनबद्दल बोलताना जान्हवीचा खुलासा

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे रिलीज झाल्यानंतर त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. आता हा चित्रपट 31 मे रोजी रिलीज होणार असून यातील इंटीमेट सीनबद्दल जान्हवी कपूरने मोठा खुलासा केलाय.   

नेहा चौधरी | Updated: May 29, 2024, 02:33 PM IST
'आमच्या दोघांची शरीरं अगदी...'; 'Mr & Mrs Mahi' मधील राजकुमार रावबरोबरच्या इंटीमेट सीनबद्दल बोलताना जान्हवीचा खुलासा title=
janhvi kapoor rajkummar rao

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे चाहते या दोघांमधील रोमान्स पाहण्यासाठी उत्सुक आहे. जान्हवी आणि राजकुमार राव यांचा मिस्टर अँड मिसेस माही येत्या शुक्रवारी 31 मार्चला रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी आणि राजकुमार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. नुकताच एका मुलाखतीत जान्हवीने राजकुमार रावसोबत या चित्रपटामधील इंटीमेट सीनबद्दल खुलासा केलाय. 

'आमच्या दोघांची शरीरं अगदी...'

या चित्रपटातील इंटीमेट सीनबद्दल जान्हवी कपूरने झी स्टुडिओच्या सोशल मीडिया पेजवर अनुभव शेअर केलाय, ज्यामध्ये अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या आणि राजच्या चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन्स आहेत आणि त्यामध्ये एक सीनच्या वेळी मी आणि राज पूर्णपणे थकलो होतो. मला आठवतं की आमचा पहिला रोमँटिक सीन 20 तासांच्या शिफ्टनंतरचा होता आणि त्यावेळी आम्हा दोघांही पूर्णपणे थकलो होतो. आमचं शरीर थकव्यामुळे तुटलं होत आणि आम्ही प्रेमात आहोत हे दाखवायचं होतं. आम्ही या चित्रपटातील पहिला किसिंग सीन देतो होतो आणि दुसरीकडे आम्ही दोघेही आतून मरणयातना सहन करत होतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

आलिया-विक्रांतबद्दलही जान्हवी म्हणाली की...

या मुलाखतीत जान्हवीला पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला. जर तिला तिचं आयुष्य कोणत्याही सेलिब्रिटीसोबत बदलायचं असेल तर ती कोणासोबत बदलेल? त्यावर अभिनेत्री लगेच म्हणाली की, आलिया भट्ट आणि विक्रांत मॅसीसोबत आवडेल. यामागील कारणही तिने सांगितलं. ती म्हणाली की, यामागील माझा अजेंडा एवढाच आहे की, ज्या दिग्दर्शकांसोबत मी आजपर्यंत काम करु शकले नाही, त्यांच्यासोबत मला सेटवर वेळ घालवता येईल. बस मला बघायच आहे की, ते कलाकारांना दिग्दर्शित करतात आणि करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडीमध्ये दिग्दर्शक कसं आलियाला कसं घडवतात ते शिकायचं आहे. तर विक्रांतबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, मला विक्रांतसारखं व्हायला आवडेल, तो कसा बारावीत नापास होऊनही घडला ते मला शिकता येईल.