सारा अली खानसोबत होणाऱ्या तुलनेवर पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूर...

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान दोघीही चांगल्याच चर्चेत आहेत.

Updated: Jul 21, 2018, 03:14 PM IST
सारा अली खानसोबत होणाऱ्या तुलनेवर पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूर... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान दोघीही चांगल्याच चर्चेत आहेत. सारा आणि जान्हवी याच वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून दोघींमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. याबद्दल पहिल्यांदाच जान्हवी खुलेपणाने बोलली आहे. .

सारा उत्कृष्ट

जान्हवी म्हणाली की, सारा आणि माझ्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही. मी तिचे सर्व सिनेमे पाहणार आहे. धडकच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये जान्हवी म्हणाली की, सारा माझ्यापेक्षा पुढे जाण्याची मला शक्यता वाटते. महिलांनी नेहमीच एकमेकींना सपोर्ट करायला हवा. जान्हवीच्या या वक्तव्याने उपस्थित लोक चांगलेच प्रभावित झाले.

धडक प्रदर्शित

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा धडक सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. आता वीकेंडला हा सिनेमा काय कमाल करतो, हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे. मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा सैराटचा हा हिंदी रिमेक आहे. करण जोहर निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतानने केले आहे.

साराचेही याचवर्षी पर्दापण

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान याचवर्षी केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. हा सिनेमा २८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यानंतर सिम्बा सिनेमात सारा, रणवीरसोबत झळकणार आहे.