jacqueline fernandez च्या अडचणीत वाढ, चौकशीसाठी हजर राहणार अभिनेत्री?

jacqueline fernandez पुन्हा समन्स, चौकशीत पोलीस तिला 'हे'  प्रश्न विचारू शकतात?  

Updated: Sep 14, 2022, 10:10 AM IST
jacqueline fernandez च्या अडचणीत वाढ, चौकशीसाठी हजर राहणार अभिनेत्री?  title=

मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (jacqueline fernandez) तिच्या अभिनयामुळे आणि घायाळ अदांमुळे चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अडकलेल्या  जॅकलिन फर्नांडिस आणि महाठग सुकेश चंद्रशेखरमध्ये असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. आता 200 कोटींच्या खंडणी प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होणार आहे. खंडणी प्रकरणी जॅकलीनची आज दिल्ली पोलीस चौकशी करणार आहेत...सुकेश चंद्रशेखरची मैत्रीण पिंकी आणि जॅकलीनची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे... (jacqueline fernandez money laundering case)

दोन दिवसांपूर्वीच जॅकलीनला दिल्ली पोलिसांनी समन्स बजावला होता. पण, त्यावेळी जॅकलीन गैरहजर राहिली. आता पुन्हा समन्स बजावल्याने जॅकलीन चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. (money laundering case) 

चौकशीत पोलीस जॅकलीनला हे प्रश्न विचारू शकतात?
- किती वेळा सुकेशशी फोनवरून संपर्क साधला?
- सुकेशशी प्रत्यक्षात किती वेळा भेट झाली?
- पिंकी ईरानी आणि जॅकलीनची ओळख कशी झाली?

कोण आहे सुकेश चंद्रशेखर  (Sukesh Chandrashekhar)
बंगळुरूहून आलेल्या सुकेश चंद्रेशखर याला महागडं जीवन जगण्याची आवड आहे. जेव्हा सुकेशला बंगळुरू पोलिसांनी पहिल्यांदा पकडले तेव्हा तो केवळ 17 वर्षांचा होता. 

जॅकलिनसोबत ती व्यक्ती आहे तरी कोण? ज्यामुळे अडकली वादाच्या भोवऱ्यात

त्या दरम्यान त्याने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा मित्र बनून एका कुटुंबाची 1.14  कोटी रुपयांची फसवणूक केली. बंगळुरूमध्ये त्याचं वाईट काम उघडझाल्यानंतर तो चेन्नईला पळून गेला.