'वाथी कमींग' भारतीय महिला खेळाडूंचा डान्स व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Updated: Mar 11, 2021, 01:20 PM IST
'वाथी कमींग' भारतीय महिला खेळाडूंचा डान्स व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या विजयानंतर एक धमाकेदार व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत भारतीय महिला क्रिकेटपटू वेद कृष्णमूर्ती, दिव्या, वनिता आणि आकांक्षा यांनी विजय मास्टर यांनी डान्स केला आहे. या महिला क्रिकेटपटूने 'वाथी कमिंग' या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध काल दुसरा एकदिवसीय सामना जिंकला. या विजयानंतर वेद कृष्णामूर्ती, आकांक्षा कोहली, दिव्य ज्ञानानंद, वनिता व्हीआर आणि ममता माबेन यांनी 'वाथी कमिंग' या गाण्यावर केलेला डान्स केला. सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वेदा कृष्णमूर्ती यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना वेद कृष्णमूर्ती यांनी लिहलं की, "जेव्हा मी चेन्नईत असते !! अश्या आशयाचं कॅप्शन क्रिकेटपटू वेद कृष्णामृर्ती यांनी या पोस्टला दिलं आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Veda Murthy (@vedakrishnamurthy7)

जेव्हा व्हिडीओ सुरु होतो तेव्हा ममता माबेन पाठी वळते आणि तिच्या पाठोपाठ इतर चार महिलासुद्धा मागे वळतात. जेव्हा 'वाथी कमिंग' हे वाक्य सुरु होतं तेव्हा तिच्याकडे लक्ष देतात. मग, वेद कृष्णमूर्ती, आकांक्षा कोहली, दिव्या ज्ञानानंद आणि वनिता व्हीआर हूक स्टेप करतात, 'वाथी कमिंग' या गाण्यावर धरलेला ठेका सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.



'वाथी कमिंग' हे गाणे सर्वांच्याच फेवरेट लिस्टमधील एक आहे. शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर ठेका धरला होता. याआधी, भारतीय क्रिकेटपटू आर अश्विन, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी फेब्रुवारी महिन्यात अहमदाबाद येथे इंग्लंड विरुद्ध डे-नाईट कसोटी सामन्याआधी 'वाथी कमिंग' या गाण्यावर डान्स केला होता.



याशिवाय, दिनेश कार्तिकची तामिळनाडू टिमनं सय्यद मुश्ताक अलीची टिम बडोद्याला सात विकेट्सने पराभूत केलं होतं, तेव्हा तामिळनाडूच्या संघाने 'वाथी कमिंग' या मास्टर गाण्यावर नाचून सेलिब्रेशन केलं आणि याचं सेलिब्रेशचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.