Priyanka Chopra ने व्हिडिओ शेअर करत काय दिली खुशखबर?

परदेशात राहूनही प्रियंका कायमच भारतात चर्चेत 

Updated: Mar 11, 2021, 12:17 PM IST
Priyanka Chopra ने व्हिडिओ शेअर करत काय दिली खुशखबर? title=

मुंबई : प्रियंका चोप्रा सध्या आपला नवरा म्हणजे निक जोनससोबत क्वालिटी वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर हे दोघं खूप ऍक्टिव असून फोटो शेअर केलेत. आता इंस्टाग्रामवर प्रियंका चोप्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने आपण 93 ऑस्कर अवॉर्ड नॉमिनेशन्सची घोषणा करणार असल्याची माहिती दिली आहे. 

प्रियंका-निक करणार ऑस्करच्या नॉमिनेशन्सची घोषणा 

व्हिडिओत प्रियंका अतिशय आनंदी आहे. ऑस्कर नामांकनाची घोषणा आपण करणार असल्याची माहिती दिली आहे. प्रियंकाच्या मागे निक उभा आहे. त्याने म्हटलंय की, हे तू आधीच सांगितलं आहे. (Priyanka Chopra बोल्ड ड्रेस , हाय हीलसह बास्केटबॉल ग्राउंडमध्ये, Hrithik Roshan ने फिरकी घेतली आणि ट्रोल झाली) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)

ऑस्कर इन - पर्सन टेलीकास्ट होणार 

जगभरात कोरोना महामारी असल्यामुळे यंदा अवॉर्ड फंक्शन थोडा उशिरा होणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ऑस्कर सोहळा होता. मात्र यंदा ते 26 एप्रिल रोजी होणार आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा हा एमी अवॉर्ड्स आणि गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सप्रमाणे असतील अशी आशा आहे. 

बॉलीवूड आणि हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नेहमीच सोशल मीडियावर प्रियंकाची चर्चा होत असते. एकीकडे काहिदिवसांपासून तिचं पुस्तक 'अनफिनिश्ड' मुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे प्रियांका तिचं रेस्टोरेंट बिजनेसमुळे चर्चेत आहे. मात्र प्रियांकाची चर्चा आता पुस्तक किंवा बिजनेसमुळे नाही तर चक्क तिच्या लूकमुळे होते आहे आणि या फोटोमुळे तिला ट्रोलिंगला शिकार व्हावं लागत आहे.

मिसवर्ल्ड किताब पटवलेल्या प्रियंकानं एक फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तीनं काळ्यारंगाचा बोल्ड ड्रेस परिधान आहे. या लूकमध्ये तीनं हाय हिल सेंडल घातल्या आहेत. मात्र आकार्षणाची बाब म्हणजे प्रियांका या अवतारात बास्केटबॉल ग्राउंडमध्ये हातात बास्केटबॉल घेवून उभी हे पाहायला मिळतंय.