मानुषी छिल्लरमुळे सर्वाधिक 'मिस वर्ल्ड'च्या यादीमध्ये भारत अव्वलस्थानी

तब्बल १७ वर्षांनंतर 'मिस वर्ल्ड' हा सौंदर्यवतींचा मानाचा मुकूट भारताने पटकवला आहे.

Updated: Nov 19, 2017, 11:25 AM IST
मानुषी छिल्लरमुळे सर्वाधिक 'मिस वर्ल्ड'च्या यादीमध्ये भारत अव्वलस्थानी  title=

मुंबई : तब्बल १७ वर्षांनंतर 'मिस वर्ल्ड' हा सौंदर्यवतींचा मानाचा मुकूट भारताने पटकवला आहे.

हरियाणाच्या मानुषी छिल्लर या २० वर्षीय युवतीने मिस वर्ल्ड हा किताब पटकवला आहे. चीनमध्ये या सोहळ्याची अंतिम फेरी रंगली. तब्बल १०८ सुंदरींमधून मानुषी छिल्लरची निवड झाली.  

काय आहे रेकॉर्ड 

मानुषीला मिळालेला हा किताब तिच्या वैयक्तिक आयुष्यातील जितका महत्त्वाचा आणि मानाचा आहे. तितकाच तो भारतीयांसाठीदेखील आहे. भारताने आजतागातय सहा वेळेस ' मिस वर्ल्ड' हा किताब मिळवला आहे. सर्वाधिक 'मिस वर्ल्ड' मिळवणार्‍या देशांच्या यादीमध्ये आता भारत अव्वलस्थानी आला आहे. 

भारताप्रमाणेच व्हेइनझुएला या देशाकडेही सहा वेळेस 'मिस वर्ल्ड' किताब मिळवण्याचा मान आहे. 

 

भारताच्या सहा 'मिस वर्ल्ड' सौंदर्यवती   कोण ? 

 भारताला सर्वप्रथम 'मिस वर्ल्ड' हा किताब 1966 साली रिता फारिया यांनी मिळवून दिला. त्यानंतर ऐश्वर्या राय  १९९४ साली 'मिस  वर्ल्ड ' झाली.  त्यानंतर १९९७ साली डायना हेडन 'मिस वर्ल्ड' झाली. त्यानंतर १९९९ आणि  २००० साली लागोपाठ दोनदा भारताला 'मिस वर्ल्ड' हा किताब मिळाला. यामध्ये १९९९ साली युक्ता मुखी तर २००० साली प्रियांका चोप्रा 'मिस  वर्ल्ड' झाली. आता प्रियांका चोप्रानंतर १७ वर्षांनंतर मानुषी छिल्लरने 'मिस वर्ल्ड' या किताबावर आपलं नाव कोरलं आहे.