कंधार हायजॅकवर IC814 ही वेब सीरिज ओटीटीवर रिलीज झाली आहे. अनेकांना ही वेब सीरिज आवडली आहे पण सोशल मीडियावर दहशतवाद्यांच्या हिंदू नावांवरुन याला विरोध केला जातो. दिग्दर्शक अनुभव सिन्हाला टॅग करुन याला विरोध केला जात आहे. गेल्या 36 तासांत ट्विटर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #BoycottBollywood असा ट्रेंड सुरु झालं आहे.
या सिनेमाबद्दल काही प्रतिक्रिया अगदी सारख्याच आहेत. विमान मुस्लिम लोकांनी हायजॅक केलं तर वेब सीरिजमध्ये हिंदू नावे का दाखवली आहे, असा सवाल केला जात आहे. या प्रश्नामुळे पुन्हा एकदा IC814 ही वेब सीरिज चर्चेत आली आहे.
गुगल केल्यावर 6 जानेवारी 2000 रोजी गृह मंत्रालयामार्फत त्या हायजॅकरची नावे सहज उपलब्ध होतात.
सोशल मीडियावर याबाबत अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. ही वेब सीरिज एका सत्य घटनेवर आधारीत आहे. याचा विचार करुन वेब सीरिजमध्ये काही गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. या वेब सीरिजच्या सुरुवातीलाच सांगण्यात आलंय की, IC 814: The Kandahar Hijack Story हायजॅक केलेल्या कॅप्टन देवी शरण यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकाला आतापर्यंत 24 वर्षे झाले आहे. हे पुस्तक हजारो लोकांनी खरेदी करुन त्यांनी वाचलं देखील असेल.
काठमांडू वरुन जे विमान दिल्लीत जात होत त्यामधील दहशतवाद्यांनी लोकांचा संभ्रम निर्माण करण्यासाठी कोडनावांचा उल्लेख केला होता. ज्याचा वापर या वेब सीरिजमध्ये करण्यात आला आहे. जसे की, चिफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर. शेवटच्या दोन नावांवर हिंदू प्रेक्षकांनी विरोध दर्शवला आहे. दहशतवाद्यांनी आपली स्वतःची ओळख लपवण्यासाठी अशा पद्धतीच्या नावांचा उल्लेख केला आहे, पुस्तकामध्ये याबाबत उल्लेख केला आहे.
सोशल मीडियावर संतापाची लाट?
The hijackers of IC-814 were dreaded terrorists, who acquired aliases to hide their Muslim identities. Filmmaker Anubhav Sinha, legitimised their criminal intent, by furthering their non-Muslim names.
Result?
Decades later, people will think Hindus hijacked IC-814.
Left’s…
— Amit Malviya (@amitmalviya) September 1, 2024
सोेशल मीडिया प्रकरणावर हा संताप व्यक्त केला जात आहे. भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी देखील दहशतवाद्यांचे हिंदू नाव दाखवल्या प्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दहशतवाद्यांनी आपली मुस्लिम नावे लपवण्यासाठी वेगळी नावे ठेवल्याचं म्हटलं जातं.