फेक व्ह्यूज स्कॅममध्ये बादशाहचं नाव; हनी सिंहने दिली प्रतिक्रिया

आरोपात नाव गुंतलं जाणं म्हणजे...

Updated: Sep 7, 2020, 10:10 AM IST
फेक व्ह्यूज स्कॅममध्ये बादशाहचं नाव; हनी सिंहने दिली प्रतिक्रिया  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड रॅपर-गायक बादशाहवर सोशल मीडियावर फेक न्यूज खरेदी करण्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई पोलीस बादशाहची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बादशाहने विश्व रेकॉर्ड करण्यासाठी 'पागल' या सिनेमाकरता ७.२ करोड व्ह्यूज मिळवण्याकरता ७२ लाख रुपये खर्च केले. 

रॅपर गायक हनी सिंहशी याबाबत बोललं असता तो म्हणाला, 'मी त्या रॅपरबद्दल खूप अफवा ऐकल्या आहेत. ज्याने आपल्या गाण्याच्या प्रसिद्धीकरता खोटे व्ह्यूज खरेदी केले. मी एवढंच सांगेन की, जेव्हा मी माझ्या करिअरला सुरूवात केली. मी लोकप्रियत होत होतो तेव्हा माझ्यावर देखील अनेक आरोप लावण्यात आले.' हनी सिंह म्हणतो की, हे प्रगतीचं लक्षण आहे. आपण ज्या कलाकाराबद्दल बोलतोय त्याच्यावरही आरोप करण्यात आले. माझ्याकडून त्याला अनेक शुभेच्छा. 

फेक फॉलोअर्सचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा इंडियन आयडलमधील स्पर्धक भूमी त्रिवेदीबद्दल असाच गोंधळ झाला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम इन्टेलिजन्ट यूनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बादशहाने सोशल मीडियावर ७.२ कोटी व्ह्यूज मिळवण्यासाठी ७२ लाख रुपये दिले होते. बादशहाच्या ‘पागल है’ या गाण्याला व्ह्यूज मिळावे म्हणून त्याने हे पैसे मोजले होते. गेल्या वर्षी बादशहाने दावा केला होता की त्याच्या गाण्याला २४ तासांच्या आत ७.५ कोटी व्ह्यूज आले आहेत. मात्र गूगल आणि यूट्यूबच्या अल्फाबेट कंपनीने त्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचं सांगितलं होतं.