घरगुती हिंसा प्रकरण : हनी सिंगच्या पत्नीने मागितली तब्बल 'इतक्या' कोटींची भरपाई

बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Updated: Sep 3, 2021, 05:40 PM IST
घरगुती हिंसा प्रकरण : हनी सिंगच्या पत्नीने मागितली तब्बल 'इतक्या' कोटींची भरपाई title=

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. शालिनीने त्याच्यावर मानसिक अत्याचार आणि आर्थिक गैरवर्तनाचे अनेक गंभीर आरोप केले आहेत. जिथे आज रॅपर या प्रकरणात दिल्लीच्या तिस हजारी न्यायालयात हजर झाला. हनी सिंह आज पूर्ण तयारीसोबत येथे दाखल झाला होता. सुनावणीदरम्यान हनी सिंगने आपल्या उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे सीलबंद लिफाफ्यात न्यायालयाला दिली आहेत.

गेल्या सुनावणी दरम्यान, कोर्टाच्या आदेशानंतरही हनी सिंह येथे हजर झाला नाही. जिथे न्यायालयाने म्हटलं होतं की, असं दिसतं की, हनी सिंग हे प्रकरण अतिशय हलकेपणाने घेत आहे. त्यानंतर आज तो पूर्ण सुरक्षा व्यवस्थेसोबत ईथे पोहोचला. हनी सिंगवर त्याची पत्नी शालिनी तलवारने 'द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स अॅक्ट' अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जिथे त्याने न्यायालयात कौटुंबिक हिंसाचारासाठी याचिका दिली आहे. न्यायाधीश सध्या चेंबरमध्ये सुनावणी करत आहेत.

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने आरोप केला की, हनी सिंगचं कुटुंब, त्याचे आई -वडील आणि त्याची लहान बहीण मिळून तिचं शोषण करत आहेत. 160 पानांच्या याचिकेत शालिनीने 10 वर्षांच्या आधी हनीमूनशी संबंधित एक रहस्यही उघड केलं आहे.  एका बातमीनुसार, शालिनीनं म्हटलं आहे की, हनीसिंगने 10 वर्षांपूर्वी हनीमून दरम्यानच तिला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यासोबत, शालिनीने सांगितलं आहे की, हनी सिंग आणि तिची भेट शाळेत झाली होती जिथे ही जोडी एकत्र शिकत होती. 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, कपलने 14 मार्च 2010 रोजी कुटुंबाच्या इच्छेनुसार साखरपुडा केला आणि 23 जानेवारी 2011 रोजी लग्न केलं.

10 कोटींची भरपाई
हनी सिंगची पत्नी शालिनीने हनीकडून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.हनी सिंगच्या पत्नीचं म्हणणं आहे की, तिला जनावरांसारखी वागणूक मिळाली आहे. ज्यामुळे तिनं हे मोठं पाऊल उचललें आहे. शालिनीने कोर्टातही अपील केलं आहे की सिंगरला दर महिन्याला दिल्लीतील एका आलिशान फ्लॅटचं भाडं 5 लाख द्यावे लागेल. कारण तिला स्वतःच्या आईबरोबर राहायचं नाही. आता या प्रकरणात न्यायालयाचा काय निर्णय होतो हे पाहावे लागेल.