एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओला लाजवेल, एवढा पगार अमिताभ बच्चन, शाहरुख आणि सलमानच्या बॉडीगार्डला

सुरक्षेच्या बदल्यात मोजला जातो एवढा पैसा...

Updated: Aug 27, 2021, 02:57 PM IST
एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओला लाजवेल, एवढा पगार अमिताभ बच्चन, शाहरुख आणि सलमानच्या बॉडीगार्डला  title=

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सर्वचं  कलाकार लग्झरी आयुष्य जगतात. अनेक महागड्या गोष्टींसाठी ते कायम चर्चेत असतात. तर दुसरीकडे त्यांच्या बॉडीगार्डचा पगार एखाद्या कंपनीच्या सीईओला लाजवेल इतका असतो. सध्या महानायक अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे याचा पगार तुफान चर्चेत आला आहे. बिग बींच्या पोलीस बॉडीगार्डची आता दक्षिण मुंबई पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. जिंतेद्र हे  2015 पासून बिग बींसाठी काम करत आहेत. 

अमिताभ बच्चन जिथे जातात तिथे जितेंद्र त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे असतो. अहवालानुसार, अमिताभ बच्चन यांची सुरक्षा सांभाळण्यासाठी जितेंद्र वार्षिक 1.5 कोटी रुपये पगार घेतो. म्हणजेच, दरमहा त्याला सुमारे 12,50,000 / -रुपये पगार मिळतो. शिवाय जितेंद्र यांची स्वतःची सिक्युरिटी एजेन्सी आहे. 

शाहरुख खानच्या बॉडीगार्डबद्दल सांगायचं झालं तर त्याचं नाव रवी सिंह असं आहे. शाहरुख भारतात असो किंवा परदेशात रवी कायम त्याच्यासोबत असतो. रवी शाहरूखचा वैयक्तिक बॉडिगार्ड आहे. रिपोर्टनुसार, अनेक वर्षांपासून रवी शाहरूखसाठी काम करत आहे. शाहरुखच्या  बॉडीगार्डची वर्षाची कमाई 2.7 कोटी रूपये आहे. 

अभिनेता सलमान खानच्या बॉडीगार्डबद्दल सर्वांना माहिती आहे. सलमानच्या बॉडीगार्डचं नाव आहे शेरा. शेरा फक्त सलमानचा बॉडीगार्ड नाही तर त्याचा चांगला मित्र देखील आहे. रिपोर्टनुसार शेराची वर्षाची कमाई 2 कोटी रूपये आहे.