अपघात की षडयंत्र? अंगावर शहारे आणणारा Godhra चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Godhra Movie Teaser:  21 वर्षांपुर्वी गुजरात येथे घडलेल्या गोध्रा दुर्घटना या प्रकरणावर आधारित 'गोध्रा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा आता या चित्रपटाच्या टीझरवर खिळल्या आहेत. 

अपघात की षडयंत्र? अंगावर शहारे आणणारा Godhra चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला  title=
(Photo : Youtube)

Godhra Movie Teaser: 21 वर्षांपुर्वी गुजरात येथे घडलेल्या गोध्रा दुर्घटनेवर आधारित 'गोध्रा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीझर हा अंगावर काटा आणणारा आहे. या टिझरमधून कुठल्याही कलाकाराचा चेहरा हा दिसलेला नाही. 2002 साली झालेल्या गोध्रा दुर्घटनेवर हा चित्रपट आधारित असल्याचा दावा या चित्रपटातून करण्यात आला आहे. या टीझरमधून साबरमती एक्सप्रेस, कोच एस 6,59 शब्द ठकळपणे दाखवण्यात आले आहेत. 

त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाची दिग्दर्शन हे धुरा एम.के.शिवाक्ष यांनी केली आहे. बीजे पुरोहित आणि राम कुमार पाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आत्तापर्यंत या घटनेवर भाष्य करणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 'काय पो छे', 'परनाजिया', 'फिराक' असे सिनेमे आत्तापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. 27 फेब्रुवारी 2002 मध्ये गुजरातमधील गोद्रा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसच्या एस - 6 या बोगीला आग लावण्यात आली. अयोध्येहून परत आलेले 59 लोक यात मृत्यूमुखी पडले. यानंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या. ज्यात झालेल्या हाहाकारातही अनेकांना आपले प्राण गमावावे लागले होते. 

हेही वाचा - एअरपोर्टवर रविना टंडनच्या मुलीला पाहताच पापाराझी म्हणाले, 'मिठाई कुठे आहे?' पण कारण काय

सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटांचे नवनवे प्रयोग होत असतात. तेव्हा या चित्रपटांची बरीच चर्चाही रंगताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये विविध सामाजिक तसेच राजकीय विषयांवरही चित्रपट येताना दिसत आहेत. अनेकदा या चित्रपटांवरून वादही होतात त्यातून या चित्रपटांचे कौतुकही होताना दिसते. गेल्या वर्षी असे अनेक सिनेमे आले आणि आता या नव्या वर्षातही अनेक चित्रपट येताना दिसत आहेत. 2022 साली प्रदर्शित झालेला 'द काश्मिर फाईल्स' हा सिनेमा प्रचंड गाजला. त्याचसोबत काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झालेला 'द केरला स्टारी' हा चित्रपटही सध्या प्रचंड गाजतो आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत 200 कोटींची कमाई केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गेल्यावर्षी या चित्रपटांसह असे अनेक चित्रपट चर्चेत राहिले. नथूराम गोंडसे यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडेलकरनं नथूराम गोंडसे यांची भुमिका केली होती. यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपटही प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे सध्या बॉलिवू़डमध्ये विषयांवरील चित्रपटही येताना दिसत आहेत. त्याचसोबत ऐतिहासिक चित्रपटांचीही बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. मराठी चित्रपटांमध्येही ऐतिहासिक विषयांवरील चित्रपट हाताळले जात आहेत. यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'आदिपुरूष' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.