VIDEO: जेनेलियासोबत रियान आणि राहिलनं जोडले पापाराझींसमोर हात! पाहून सासूबाई भारावल्या अन्

Genelia Deshmukh Children Namaskar: जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख हे अनेकदा आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखले जातात. आपल्या मुलांसह ते अनेकदा स्पॉटही (Genelia Deshmukh Spotted With Mother in Law) होताना दिसतात. मुंबई एअरपोर्टवर नुकतीच जेनेलिया आपल्या मुलांसह आणि सासूबाईंसह स्पॉट झाली. यावेळीही मुलांनी पापाराझींनी पाहून नमस्कार केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 7, 2023, 02:14 PM IST
VIDEO: जेनेलियासोबत रियान आणि राहिलनं जोडले पापाराझींसमोर हात! पाहून सासूबाई भारावल्या अन्  title=
genelia deshmukh spotted with children rahyl and ryan with mother in law vaishali deshmukh at mumbai airpot departure greets paparazi with namaskar

Genelia Deshmukh Spotted at Airport: अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख आपल्या मुलांसह अनेकदा स्पॉट होताना दिसतात. त्यातून पापराझींसमोर रितेश आणि जेनेलियाची (Ritesh and Genelia) दोन्ही मुलं ही हात जोडून त्यांना नमस्कार करताना दिसतात. त्यामुळे याबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून रियान आणि राहिल (Riyan and Rahyl) या दोघांचे भरपूर कौतुक होताना दिसते. नुकतेच राहिल आणि रियान जेनेलियासोबत मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) स्पॉट झालेले पाहायला मिळाले आणि नेहमीप्रमाणे पापराझीही तिथे हजर होते.

पापराझींना पाहून त्या दोघांनी त्यांना नमस्कार केला. यावेळी रितेशच्या आईही जेनेलिया आणि मुलांसोबत आल्या होत्या. (genelia deshmukh spotted with children rahyl and ryan with mother in law vaishali deshmukh at mumbai airpot departure greets paparazi with namaskar)

सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये रियान आणि राहिल जेनेलियासोबत (Paparazzi) गाडीतून उतरतात आणि समोर पापराझी दिसताच ते त्यांच्यासमोर हात जोडतात आणि हसत नमस्कार करतात. यावेळी जेनेलियानंही पापाराझींसमोर हात जोडले होते. रियान आणि राहिलनं काळ्या रंगाची पॅन्ट आणि टीशर्ट घातला होता. तर जेनेलिया कॅज्यूअल वेअरमध्ये दिसली होती. तिनं जीन्स आणि व्हाईट टॉप व त्यावर ग्रे कलरचा जॅकेट घातला होता. त्यासोबतच पिवळ्या रंगाचे स्निकर्सही (Genelia in Casual Look) घातले होते. एक्सेसरीजमध्ये तिनं स्मार्ट वॉच आणि सनग्लासेस घातले होते. तिघांनीही बॅगपॅक घेतलं होतं. 

नेटकऱ्यांनी जेनेलिया आणि रितेशच्या दोन्ही मुलांचे भरपूर कौतुक केले आहे. काहींनी म्हटलंय की स्टार कीड्सच्या एटिट्यूडपुढे या दोघांचा संस्कार तर खूप मोठा आहे. याआधीही रियान आणि राहिलचे असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल झाले होते ज्यात दोघंही पापाराझींसमोर हात जोडून नमस्कार (Namaskar) करताना दिसतात. आपल्या मुलांना पापाराझींसमोर हात जोडायला का सांगतो यावर रितेशनं खुलासा केला होता. 

हेही वाचा - प्रयोगाच्या वेळी असं काय घडलं की डॉ. अमोल कोल्हे यांनी धरले चिमुरड्याचे पाय, पाहा Video

रितेश आणि जेनेलिया साधेपणानं राहतात आणि तेच मुलांच्याही वागणूकीतून यावं याबद्दल रितेश आणि जेनेलिया आग्रही असतात. रितेश आणि जेनेलियाच्या या निर्णयाचेही अनेकांकडून कौतुक करण्यात आले होते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल झाला आहे. यावेळी रियान आणि राहिलचा हा प्रांजळपणा पाहून सासूबाईही कौतुकानं भारावून गेल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री जेनेलियाचा पहिलावहिला मराठी चित्रपट 'वेड' (Ved Marathi Movie) प्रदर्शित झाला होता. यामध्ये रितेश आणि जेनेलियाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं तूफान कमाई केली होती. हा चित्रपट आता प्रेक्षकांसाठी ओटीटीवरही उपलब्ध झाला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.