Gandi Baat फेम अभिनेत्री शुटींग करताना झाली होती बेशुद्ध,'हे' होतं त्यामागचं कारण

पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप असणारी अभिनेत्री शुटींग करताना झाली बेहोश, असा वाचवला होता जीव  

Updated: Sep 22, 2022, 08:07 PM IST
 Gandi Baat फेम अभिनेत्री शुटींग करताना झाली होती बेशुद्ध,'हे' होतं त्यामागचं कारण  title=

मुंबई : गंदी बात (Gandi Baat) ही एक प्रसिद्ध बोल्ड वेबसीरीज आहे. या वेबसीरीजचे अनेक पार्ट रिलीज झाले आहेत. या वेबसीरीजच्या माध्यमातून अनेक अभिनेत्री चर्चेत आल्या आहेत. अशीच एक गंदी बात फेम अभिनेत्री शुटींग दरम्यान बेशुद्ध झाल्याची घटना समोर आली होती. नेमकं या घटनेत ती कशी बेशुद्ध झाली होती? याची माहिती जाणून घेऊयात.(gandi baat fame actress gehana vasisth unconscious while shooting 2019 incidend)

शुटींग करताना बेशुद्ध झाली? 
गंदी बात (Gandi Baat) फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) एका शुटींग दरम्यान बेशुद्ध झाली होती. खरं तर गहना काही न खाता 48 तास शूटिंग करत राहिली होती, ज्यामुळे ती सेटवर बेशुद्ध पडली. यादरम्यान  गहनाला रक्तदाब आणि स्ट्रोकमुळे कार्डीएक अरेस्टचा अटॅक आला होता. यावेळी तिच्या हद्याचे ठोके मंदावले होते. तिला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता.

 

आणखी वाचा : Adult वेबसीरीजमध्ये 'या' अभिनेत्री माजवली खळबळ,फोटो पाहून थक्क व्हाल

 

यावेळी शुटींग थांबवून गहनाला मुंबईतील मालाड येथील डिफेन्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.गहनाची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तासनतास आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. यादरम्यान, ऑक्सिजनची पातळी ठीक करण्यासाठी डॉक्टरांनी गहनाला काही तासांसाठी व्हेंटिलेटरवर ठेवले होते. या घटनेवर रुग्णालयाच्या प्रमुखांनी सांगितले की, गहनाचे (Gehana Vasisth) हद्याचे ठोके पुर्ववत करण्यासाठी सुमारे दोन तास लागले होते. तसेच तिचा जीव वाचवण्यासाठी तिला विजेचा शॉक द्यावा लागला होता. 

गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) मधुमेह आणि बीपीचा त्रास आहे. शूटिंगदरम्यान गहना एनर्जी ड्रिंक्स आणि औषधे घेऊन शूटिंग करत होती. ज्याचा तिच्या शरीरावर वाईट परिणाम झाला आणि ही घटना घडली होती. 2019 रोजी एका वेबसीरीजची (Web series) शुटींग करताना ही घटना घडली होती.