....अशी दिसते विनोदवीर कपिल शर्माची लेक

पाहा तिचा एक सुरेख फोटो 

Updated: Jan 15, 2020, 05:15 PM IST
....अशी दिसते विनोदवीर कपिल शर्माची लेक title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : विनोदी कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या कपिल शर्माने कारकिर्दीत संघर्षाचा काळही पाहिला. अर्थात त्या काळाचाही त्याने धीराने सामना केला. यामध्ये कपिलला साथ मिळाली ती म्हणजे पत्नी गिन्नी छतरथ हिची. आव्हानाच्या दिवसांचा सामना करणारा हाच कपिल शर्मा सध्या मात्र आनंदाच्या परमोच्च शिखरावर आहे. 

कपिलच्या या आनंदास कारण आहे ती म्हणजे त्याची मुलगी. काही दिवसांपूर्वीच कपिलने आपल्या कुटुंबात एका चिमुकलीचा प्रवेश झाल्याचं जाहीर केलं होतं. ज्यानंतर त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सध्या कपिल पुन्हा चर्चेत आला आहे, ते म्हणजे त्याच्या मुलीमुळेच. आपल्या मुलीचा पहिलाच फोटो कपिलने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

वाचा : भाचीच्या भेटीला आलेल्या सलमानला पाहून अर्पिता भावूक

'भेटा आमच्या काळजाच्या तुकड्याला.... अनायरा शर्माला', असं कॅप्शन देत कपिलने त्याच्या मुलीचं नावही सर्वांना सांगितलं. या फोटोमध्ये कपिलची लेक अनायरा हिची निरागसता सर्वांची मनं जिंकत आहे. 

 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

कपिल आणि त्याच्या पत्नीच्या जीवनात अनायराच्या रुपात एक नवी पहाट झाली आहे, असंच म्हणावं लागेल. फक्त कपिल आणि त्याची पत्नी गिन्नीच नव्हे, तर त्याचं संपूर्ण कुटुंब सध्या जणू काही एका अद्वितीय आनंदाचाच अनुभव घेत आहेत. मुलीच्या जन्मानंतर कपिलने काही दिवस कामाच्या व्यापापासून दूर राहणं पसंत केलं होतं. ज्यानंतर आता तो पुन्हा एकदा कामावर लक्ष केंद्रीत करत आहे.