विकी-कतरिना पाठोपाठ बॉलिवूडचं 'हे' प्रसिद्ध कपल मार्चमध्ये अडकणार लग्नबंधनात

बॉलिवूडचं आणखी एक कपल अडकणार लग्नबंधनात

Updated: Jan 4, 2022, 09:04 PM IST
विकी-कतरिना पाठोपाठ बॉलिवूडचं 'हे' प्रसिद्ध कपल मार्चमध्ये अडकणार लग्नबंधनात title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. फरहान अख्तर बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकरला डेट करत आहे. आता हे दोघं मार्च 2022 मध्ये लग्न करणार आहेत. नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान आणि शिबानी ग्रँड वेडिंगची योजना आखत होते. पण कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे कपल अगदी साधेपणानं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोनामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं
कोरोनामुळे बिघडलेलं वातावरण पाहता, फरहान आणि शिबानी कुटुंबातील सदस्य आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीतच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.बातम्यांनुसार, दोघांना खूप आधीपासूनच लग्न करायचं होतं, पण कोरोना व्हायरसमुळे त्यांना त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली होती. पण आता पुन्हा फरहान-शिबानी कोरोनामुळे लग्न पुढे ढकलू इच्छित नाहीत.

कशी चालली आहे तयारी जाणून घ्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी लग्नासाठी मुंबईत एक 5-स्टार हॉटेल बुक केलं आहे आणि लग्नाची बाकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. फरहान आणि शिबानी त्यांच्या लग्नाच्या खास प्रसंगी सब्यसाचीने डिझाइन केलेले पोशाख परिधान करणार असल्याची बातमी आहे. यासाठी या दोन्ही कलाकारांनी पेस्टल कलर निवडले आहेत.