Fact Check : बंद खोलीत गुलशन ग्रोवरवर रोमान्स करत होती कतरिना, अमिताभ बच्चन यांनी पकडलं रंगेहात

कतरिना कैफ (Katrina Kaif) आज बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Updated: Sep 30, 2022, 07:59 PM IST
Fact Check : बंद खोलीत गुलशन ग्रोवरवर रोमान्स करत होती कतरिना, अमिताभ बच्चन यांनी पकडलं रंगेहात  title=

मुंबई : कतरिना कैफ (Katrina Kaif) आज बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज तिची गणना टॉप अभिनेत्रींमध्ये होते. गेल्या अनेक वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. या दरम्यान तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. कतरिना कैफने बॉलिवूड इंडस्ट्रीत 19 वर्षे पूर्ण केली आहेत.

2003 मध्ये बूम (Boom) या आय बी ग्रेड चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोवर आणि मधु सप्रे हे देखील मुख्य भूमिकेत होते.  

वास्तविक, या चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांनी गुलशन ग्रोवरसोबत बंद खोलीत किस करताना कतरिनाला रंगेहात पकडलं होतं. या चित्रपटात अभिनेत्री कतरिना आणि गुलशन यांच्या लिपलॉकचा एक सीन चित्रित केला जाणार होता. हे दोघं बंद खोलीत या सीनचा सराव करत होते. यादरम्यान अमिताभ बच्चन तिथून पुढे गेले आणि त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. बीग बींना तिथे पाहून दोघांचीही तारांबळ उडाली.

विशेष म्हणजे, दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांचा बूम हा चित्रपट बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत होता. कतरिना कैफचा हा पहिला चित्रपट होता आणि त्यात तिने बॉलीवूडचा बेड मॅन गुलशन ग्रोवरसोबत लिपलॉक सीन दिला होता. या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी गुलशन ग्रोव्हरने मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, कतरिना कैफसोबतच्या किसिंग सीनमुळे तो खूपच अस्वस्थ झाला होता. यामुळेच त्याने कतरिनासोबत बंद खोलीत किसी करण्याचा सरावही अनेकदा केला होता. (Katrina was romancing Gulshan Grover in a closed room Amitabh Bachchan caught red handed)

अभिनेता गुलशन ग्रोव्हरने सांगितलं होतं की, जेव्हा मी कतरिनासोबत किस सीनचा सराव करत होतो तेव्हा अचानक अमिताभ बच्चन तिथे आले. त्यांना बघून आमची अवस्था बिकट झाली. मात्र, त्यांनी आम्हाला साथ दिली. या चित्रपटात दिग्दर्शकाने कतरिना कैफला सांगितलं होतं की, टेबलावर बसताना तिला अभिनेता गुलशनची कॉलर धरून किस करायचं आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शकाचे बोलणे ऐकून गुलशन आश्चर्यचकित झाले. पण कतरिना कैफने परफेक्ट सीन दिला.