करितानाच्या घरी कोणी तरी येणार? नवीन Videoमुळे चर्चेला उधाण

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरी कोणी तरी येणार आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

Updated: Aug 28, 2022, 07:52 PM IST
करितानाच्या घरी कोणी तरी येणार? नवीन Videoमुळे चर्चेला उधाण title=
entertainment news katrina kaif hides clearly baby bump amid pregnancy rumours and entertainment gossips

Katrina Kaif Hides Baby Bump: गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याला कारणही तसंच आहे कतरिना आणि विकी कौशल (Vicky Kaushal) अनेक वेळा क्लिनिकच्या बाहेर दिसले आहेत. त्यामुळे कतरिना प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. त्यात कतरिना सोशल मीडियावर असे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते ते पाहून तुम्हाला नक्कीच वाटेल गूड न्यूज आहे. या व्हिडीओमध्ये ती आपला बेबी बंप लपवत्यांना दिसत आहे. (entertainment news katrina kaif hides clearly baby bump amid pregnancy rumours and entertainment gossips)

कोणी तरी येणार येणार गं!

कतरिनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती लूज क्रीम कलरचा ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती घरातील गॅलरीमध्ये खुर्चीवर बसलेली दिसतं आहे. व्हिडीओमध्ये बेबी बंप दिसून नये म्हणून तिने एक पाय वर घेतला आहे. त्यामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरी कोणी तरी येणार आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

पण या व्हिडीओमधील कतरिनाची अदा चाहत्यांचं मन घायाळ करत आहे. कतरिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ''Sunday vibes'' असं कॅप्शन लिहून हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

कतरिना-विकीचं लग्न

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह 9 डिसेंबर 2021मध्ये राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये संपन्न झाला होता. या लग्नात काही निवडक बॉलीवूड सेलिब्रिटींशिवाय दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक सामील झाले होते. विकी आणि कतरिनाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)