Man vs Wild:बेयर ग्रील्स येणार भारतात, चित्तथरारक साहस करताना दिसणार प्रियंका आणि विराट

Man vs Wild: साहसीवीर बेअर ग्रील्सने एका मुलाखतीत प्रियंका चोप्रा आणि विराट कोहलीचं कौतुक केलं होतं. दोघांचेही लाखो चाहते आहे. त्यांचा प्रवास जाणून घेण्यास चाहत्यांना आवडेल,  असं बेअर ग्रिल्सने म्हटलं होतं. 

राजीव कासले | Updated: Jun 7, 2023, 10:33 PM IST
Man vs Wild:बेयर ग्रील्स येणार भारतात, चित्तथरारक साहस करताना दिसणार प्रियंका आणि विराट title=

Man vs Wild: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एक कार्यक्रम डिस्कव्हीर वाहिनीवर प्रसिद्ध करण्यात आला होता. यात पंतप्रधान मोदी एका व्यक्तीबरोबर जंगल सफारी करताना दिसले होते. या साहसीवीराचं नाव आहे बेयर ग्रील्स (Bear Grylls). जंगल, दऱ्या-खोऱ्यातील साहसी प्रवासासाठी बेअर ग्रील्स ओळखला जातो. त्याचा 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' (Man vs Wild) हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. आता बेअर ग्रील्स नव्या कार्यक्रमासह पुन्हा भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) किंवा बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) या कार्यक्रमात दिसण्याची शक्यता आहे. 

बेअर ग्रील्सच्या कार्यक्रमाता आतापर्यंत अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रजनीकांत, अक्षय कुमार, विक्की कौशल यांच्याबरोबरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासुद्ध सहभागी झाले होते. भारतीय सेलेब्रिटींच्या कार्यक्राला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं होतं. अशात जर प्रियंका किंवा विराट बेअर ग्रील्सबरोबर साहस करताना दिसल्यास चाहत्यांसाठी ती एक पर्वणीच ठरणार आहे. 

प्रियंका-विराटचं कौतुक
बेयर ग्रील्सने एका कार्यक्रमात प्रियंका चोप्रा आणि विराट कोहलीचं कौतुक केलं होतं. प्रियंका आणि विराट दोघंही प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत. जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्यामुळे दोघांपैकी कोणीही कार्यक्रमात सहभागी झालं तर ती माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट असेल असं बेयर ग्रील्सने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका किंवा विराटपैकी एक जण बेयर ग्रील्सबरोबर कार्यक्रमात दिसणार असून लवकरच या कार्यक्रमांचं शुटिंगही सुरु होणार आहे. पण प्रियंका की विराट असणार याबाबत मात्र बेअर ग्रील्स स्पष्ट केलेलं नाही.

भारत आवडता देश
बेयर ग्रील्स हा भारताच्या प्रचंड प्रेमात आहे. जेव्हा जेव्हा भारतात येतो, तेव्हा तेव्हा इथल्या लोकांचं आपल्याला भरपूर प्रेम मिळतं असं ग्रील्स म्हणतो. भारतीय खूपच प्रेमळ आणि आपुलकीची वागणूक देणारे आहेत, इथल्या लोकांबरोबर आपलं चांगलं बॉण्डिंग असल्याचं ग्रील्स म्हणतो. 

प्रियंका शुटिंगमध्ये व्यस्त
दरम्यान, अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या 'हेड्स ऑफ स्टेट'  या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतीच प्रियंकाची सिटाडेलही मालिका प्रदिर्शत झाली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ही सीरिज चांगली सुपरहिट ठरलीय. प्रियंका बॉलिवूडपेक्षा हॉलीवूडमध्ये जास्त दिसू लागली आहे. दुसरीकडे विराट कोहली सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये खेळतोय. त्यामुळे बेयर ग्रील्सबरोबरच प्रोजेक्ट कधी होणार याकडे दोघांच्याही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.