VIDEO: हातात वॉटरबॉटल घेतल्याने 7 महिन्यांच्या मुलीची आई आलिया झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले 'तू खूपच....'

Alia Bhatt: अलिया भट्ट ही आपल्या अभिनयानं कायमच चाहत्यांना वेड लावते. सध्या रणबीर हा आपल्या आगामी एनिमलच्या शुटिंगमध्ये व्यस्त दिसतो आहे. त्यातून आता सगळीकडेच चर्चा आहे ती राहा कपूरची. परंतु यावेळी राहाची आई पुन्हा ट्रोल झाली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 7, 2023, 08:25 PM IST
VIDEO: हातात वॉटरबॉटल घेतल्याने 7 महिन्यांच्या मुलीची आई आलिया झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले 'तू खूपच....' title=
(Photo : Viral Bhayani | Instagram)

Alia Bhatt: अलिया भट्ट ही सध्याची लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यातून तिची अनेकदा चर्चा होताना दिसते. मध्यंतरी आलिया आपली लाडकी लेक राहासोबत स्पॉट झाली होती. तेव्हा राहाची झलक पाहण्यासाठी नेटकरी आतूर होते. परंतु आलियानं पुर्ण प्रयत्न करत आपल्या लेकीचा चेहरा लपवण्याचा तिनं पुर्णपणे प्रयत्न केला. सेलिब्रेटी हे अनेकदा कुठे ना कुठेतरी स्पॉट होताना दिसतात. कधी एअरपोर्टवर तर कधी कुठल्यातरी इव्हेंटला. त्यामुळे त्यांच्या लुक्सची कायमच चर्चा होताना दिसते, अशातच आलिया भट्ट ही कायमच पापाराझींच्या निशाण्यावर असते. एकतरी तिच्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहते आतूर तरी असतात नाहीतर तिला अनेक प्रश्न विचारून तिला भंडावून तरी सोडतात. 

आता आलिया भट्ट पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. यावेळी तिनं गुलाबी पंजाबी कुर्ता आणि पॅन्ट घालत ती स्पॉट झाली यावेळी तिच्या हातात पाण्याची बाटलीही होती. तिचा हा लुक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेक जण म्हणाले आहेत की, आलिया स्वत:च किती लहान वाटते ती तर 7 महिन्यांच्या मुलीची आई आहे असं वाटतंच नाही. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. त्यासाठी तिला अनेकांनी जर वयाला वागून तशी नीट वागत जा असे बोचक सल्लेही दिले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आलिया ही एका बिल्डिंगमधून कारमध्ये बसताना दिसते आहे. तेव्हा ती स्पॉट होते आणि तिला नेटकरी ट्रोल करतात. 

हेही वाचा - वयाच्या 40 साव्या वर्षी दोन मुलींची आई, वजनामुळे ट्रोल झाल्यावर नेटकऱ्यांना सुनावले खडेबोल

यावेळी ती पापराझींना पोझ देते आणि गाडीमध्ये बसते. गाडी बसताना जो तिला दरवाजा लावून देतो त्यांना ती आदरानं थॅंक्यूही म्हणते. यावेळी काही ट्रोलर्स म्हणतात की, आलिया तर आता एक्टिंगमधून रिटायर्ड झाली आहे. तिच्या आता फक्त राहाची आई, अशीच ओळख आहे. तर काहींनी तिची स्तुतीही केली आहे. एका युझरनं लिहिलंय की वा, राहाची आई तर सगळीकडेच जमकते आहे. आलिया आणि रणबीर यांच्या घरी राहाचे 6 नोव्हेंबर रोजी आगमन झाले. त्याआधी त्यांनी मागील वर्षी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी आलियानं तिच्या प्रेग्नंन्सीची घोषणा केल्यावर झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलियाचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तेव्हा या चित्रपटाचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.