Kajol DeepFake Video : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) गेल्या काही काळात डीपफेक व्हिडिओमुळे (DeepFake) चांगलीच चर्चेत होती. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने रश्मिका मंदानाचा चेहरा दुसऱ्या एका मुलीच्या शरीरावर लावून त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. हे प्रकरण शांत होत नाही तोच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा (Kajol) डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काजोलचा अश्लिल व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काजोलचा अश्लिल व्हिडिओ बनवण्यात आला आहे. यात काजोल कॅमेरासमोर कपडे बदलताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काजोलच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. वास्तविक व्हिडिओत दिसणारी मुलगी ही काजोल नाहीए, ती एक सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंजर असल्याचं सांगितलं जात आहे. तीने आपला कपडे बदलतानाचा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केला होता. हा व्हिडिओ जून महिन्यात सोशल मीडियावर शेअर करणअयात आला होता. सायबर गुन्हेगारांनी या व्हिडिओत तंत्रज्ञानाच्या मदतीने सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंजर मुलीचा चेहरा हटवत त्या जागी काजोलचा दाखवला आहे.
सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंजर रोजी ब्रीनचा हा व्हिडिओ आहे. रोजी ब्रीन ही इंग्लंडमध्ये राहाते. रोजीने पाच जूनला हा व्हिडिओ आपल्या टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला होता. गेट' रेडी विथ मी ट्रेंड'चा (Get Ready With Me) तो एक भाग होता.
रश्मिका प्रकरणात पोलिसांची कारवाई
रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडिओत दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबरला तक्रार दाखल करुन घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 15 नोव्हेंबरला आरोपीला शोधून काढलं. दिल्ली पोलिासंनी बिहारमध्ये राहाणाऱ्या 19 वर्षांच्या मुलाला या प्रकरणी अटक केली आहे. रश्मिकाच्या डीपफेक प्रकरणात सर्वात आधी अमिताभ बच्चन यांनी आवाज उठवला. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली. पण केवळ भारतातच नाही तर हॉलिवूडमध्येही टॉम हॅक्स, क्रिस्टिन बेल आणि जिम्मी डोनाल्डसन डीपफेक व्हिडिओचे शिकार झालेत.
काय आहे डीपफेक?
डीपफेक तंत्रज्ञान म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चेहरा हटवून त्या जागी दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा लावणे. डीपफेक हा शब्द डीप लर्निंगमधून आला आहे. डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचा एक भाग आहे. नावामध्ये डीप म्हणजे अनेक स्तर आहेत आणि ते आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कवर आधारित आहे. या अल्गोरिदममध्ये, बनावट कॉन्टेंटमध्ये भरपूर डेटा एडिट करून खोट्या फोटोला खरं केलं जातं