MPSC Exams : दरवर्षी मोठ्या संख्येनं राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करत असतात. विविध विषय, त्या विषयांची तयारी आणि अखेरीस दिली जाणारी परीक्षा या संपूर्ण चक्रामध्ये या इच्छुकांना काही अटी लागू असतात. एमपीएससीसाठीची अशीच एक सर्वात महत्त्वाची अट म्हणजे वयोमर्यादेची. पण, आता मात्र या अटीतही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. काय आहेत हे बदल? पाहा....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेत येणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया पाहता याणध्ये कमाल वयोमार्यदेत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. या निर्णयामुळं महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारां याचा थेट फायदा मिळणार असून त्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. (MPSC Student Age Limit)
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती देणारी x पोस्ट करत ही बातमी जाहीर केली. ज्यामुळं वयोमर्यादा ओलांडल्या कारणाने नोकरीपासून वंचित लाखो उमेदवार आणि इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आपले महायुती सरकार!
कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत शासन निर्णय...महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमार्यदेत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच… pic.twitter.com/1k4f153F0i
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 23, 2024
31 डिसेंबर, 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरांतीना अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्ष शिथिलता देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1 जानेवारी 2024 ते सदर शासन निर्णयाच्या तारखेपर्यंच्या पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत एक वर्ष वाढीव इतकी शिथिलता देण्यात आली आहे.