Ekta Kapoor Trolled : वाढत्या वजनामुळे एकता कपूर ट्रोल, यूजर्स म्हणाले- 'छोटा भीम'

 टीव्हीची क्वीन एकता कपूर नेहमीच तिच्या स्टाईलमुळे वर्चस्व गाजवते. एकता कपूरची अशी एकही मालिका नाही जी लोकांना आवडत नसेल. याच कारणामुळे तिला टीव्हीची क्वीनही म्हटलं जातं. कुठल्या ना कुठल्या कारणाने एकता हेडलाईन्सचा भाग राहते. तिने शुक्रवारी MAMI फिल्म फेस्टिव्हल 2023 च्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. 

Updated: Oct 28, 2023, 01:10 PM IST
Ekta Kapoor Trolled : वाढत्या वजनामुळे एकता कपूर ट्रोल, यूजर्स म्हणाले- 'छोटा भीम' title=

मुंबई : टीव्हीची क्वीन एकता कपूर नेहमीच तिच्या स्टाईलमुळे वर्चस्व गाजवते. एकता कपूरची अशी एकही मालिका नाही जी लोकांना आवडत नसेल. याच कारणामुळे तिला टीव्हीची क्वीनही म्हटलं जातं. कुठल्या ना कुठल्या कारणाने एकता हेडलाईन्सचा भाग राहते. तिने शुक्रवारी MAMI फिल्म फेस्टिव्हल 2023 च्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. यावेळचे तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

चित्रपट महोत्सवात एकता काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती खूप छान दिसत होती पण तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे.

एकता कपूर झाली ट्रोल 
एकता कपूरचा रेड कार्पेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, छोटा भीम, तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलंय की, यात एकता कुठे आहे, 2-4 मिसळून बनवली आहे. तर एकाने लिहिलं आहे की, यार, तिचा ड्रेसिंग सेन्स खूपच खराब आहे. एकता कपूरला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही. याआधीही ती अनेकवेळा तिच्या ड्रेसमुळे बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, एकता कपूरने नुकताच थँक यू फॉर कमिंग या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एकता आणि रिया कपूर यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली होती. भूमी पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंग, कुशा कपिला, शिबानी बेदी, करण कुंद्रा यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.