मुंबई : बॉलिवूड म्हटलं की, ग्लॅमर, प्रसिद्धी, सौंदर्य यासर्व चांगल्या गोष्टींसोबत एक कटू सत्य म्हणजे कलाकारांच्या वाट्याला येणारा कास्टिंग काऊचचा अनुभव. कित्येक कलाकारांना ब्रेक हवा असल्यामुळे कँप्रोमाईज या शब्दाचा सामना करावा लागतो. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कास्टिंग काऊचबद्दल आलेले अनुभव उघडपणे सांगितले आहेत. अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan)ला सुद्धा इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.
पिंकव्हिलासोबत झालेल्या मुलाखतीत झरीनने करियर आणि खासगा आयुष्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. झरीनने सांगितलं तिला कशाप्रकारे कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. इडस्ट्रीमध्ये पाय ठेवल्यानंतर ती पहिल्यांचा कास्टिंग काऊचचा शिकार झाली.
चित्रपटाच्या दिग्दर्शकाने किसिंग सीनसाठी त्याच्यासोबत रिहर्सल करण्यासाठी सांगितलं. पण झरीनने दिग्दर्शकाला स्पष्ट शब्दात नकार दिला. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा झरीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा तिची तुलना अभिनेत्री कतरीना कैफसोबत होवू लागली. त्यामुळे आजपर्यंत झरीनला तिला हवी तशी संधी मिळाली नाही.