मुंबई : 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतात. विवेक सोशल मीडियावर त्यांच मत मांडताना दिसतात. विवेक यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी वय वाढत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे. विवेक यांनी केलेल्या या पोस्टमधून बॉलिवूडचा खिलाडी कुमार अभिनेता अक्षय कुमार आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानला टोमणा मारल्याचे म्हटले जात आहे.
तरुण अभिनेत्रींवर रोमान्स करण्यासाठी बॉलीवूडचे जुने कलाकार बॉलीवूडला उद्ध्वस्त करत असल्याचे त्याने म्हटले आहे. विवेक यांनी नुकतचं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये, 'चित्रपटाच्या गुणवत्तेबद्दल विसरून जा, जेव्हा 60 वर्षांचा अभिनेता 20-30 वर्षांच्या मुलींसोबत रोमान्स करतात, तेव्हा तरुण दिसण्यासाठी त्यांचे चेहरे फोटोशॉप करतात. बॉलिवूडमध्ये मूलभूतपणे काहीतरी चुकीचे आहे.'
Forget the quality of a film, when 60 yr old heroes are desperate to romance 20/30 yr old girls, photoshopping faces to look young, there is something fundamentally wrong with Bollywood.
‘Looking young & cool’ has destroyed Bollywood. And only one person is responsible for this.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 12, 2022
पुढे विवेक यांनी ट्वीटमध्ये म्हणाले की,'यंग आणि कूल लूकच्या प्रयत्नात बॉलीवूडचा नाश केला आहे आणि या सगळ्यासाठी फक्त एकच व्यक्ती जबाबदार आहे.' विवेक अग्निहोत्री यांनी त्या एका व्यक्तीचे नाव लिहिले नसले तरी 60 वर्षांच्या अभिनेत्याने 20-30 वर्षांच्या अभिनेत्रींवर रोमान्स केल्यानंतर त्यांनी आमिर किंवा अक्षयवर निशाणा साधल्याचा अंदाज लोकांकडून व्यक्त केला जात आहे.
'रक्षा बंधन' चित्रपटात अक्षयच्या अभिनेत्रीची भूमिका भूमि पेडणेकर साकारत असून ती 33 वर्षांची आहे, तर अक्षय कुमार 57 वर्षांचा आहे. तर 'लाल सिंग चड्ढा' यात आमिर खान आणि करीना यांच्या भूमिका आहेत. करीना 41 वर्षांची आणि 57 वर्षांचा आहे. अशा स्थितीत विवेकने हे ट्वीट या दोघांपैकी एकावर केल्याचे म्हटले जात आहे.
दुसरीकडे, 'कॉफी विथ करण 7' मध्ये आमिरने सांगितले होते की, 'लाल सिंह चड्ढा'साठी करीना कपूरला पहिली पसंती नव्हती कारण त्याला या भूमिकेसाठी एक तरूण अभिनेत्री हवी होती. त्याने सांगितले की, सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की, चित्रपटात तरुण अभिनेत्रीला कास्ट करणं योग्य असेल. आम्ही 25 वर्षांची अभिनेत्री शोधत होतो जेणेकरून ती तरुणांसोबत म्हातारी पण दाखवता येईल. पण, नंतर आम्ही करीनाला पाहिल आणि आमचा प्लॅन बदलला.