मुलगी ईशाच्या घटस्फोटाच्या निर्णयावर वडील धर्मेंद्र नाराज, लेकीला दिला सल्ला

Esha Deol and Bharat Takhtani Divorce: अभिनेत्री ईशा देओलने (Esha Deol) आपण घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी (Bharat Takhtani) 11 वर्षांनी वेगळे होत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 17, 2024, 02:18 PM IST
मुलगी ईशाच्या घटस्फोटाच्या निर्णयावर वडील धर्मेंद्र नाराज, लेकीला दिला सल्ला title=

Esha Deol and Bharat Takhtani Divorce: अभिनेत्री ईशा देओल आणि उद्योजक भरत तख्तानी यांनी लग्नाच्या 11 वर्षांनी आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशाचे वडील धर्मेंद्र हे मुलीच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे नाराज आहेत. तिने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी त्यांची इच्छा आहे. Bollywood Life ने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, "कोणत्याही पालकांना त्यांचं कुटुंब अशाप्रकारे मोडत असल्याचं पाहण्याची इच्छा नसते. धर्मेंद्रदेखील एक वडील असून, त्यांच्या वेदना आपण समजू शकतो. ते आपल्या मुलीच्या घटस्फोटाच्या निर्णयाविरोधात नाहीत. पण तिने फेरविचार करावा अशी त्यांची इच्छा आहे".

सूत्राने ईशा आणि तिचा पती भरत यांचं धर्मेंद्र यांच्याशी फार जवळचं नातं असल्याचं सांगितलं आहे. जर कुटुंब मोडलं तर त्याचा परिणाम मुलांना भोगावा लागतो यामुळे तिने फेरविचार करावा अशी धर्मेंद्र यांची इच्छा आहे. "ते खरंच दुखी आहेत.. त्यामुळे दोघांनी आपल्या निर्णयावर चिंतन करावं असं त्यांना वाटत आहे. ईशा आणि भारत यांनी राध्या आणि मिराया नावाच्या दोन मुली आहेत. त्या आपल्या आजी-आजोबांशी फार जवळ आहेत. दोघे वेगळे झाल्यास मुलांवर वाईट परिणाम होतो, त्यामुळे धर्मेंद्र हे लग्न वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत," असं सूत्राने सांगितलं आहे.

ईशा देओल आणि भरत यांनी संयुक्त निवेदन जारी करत आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये लिहिण्यात आलं होतं की, "आम्ही परस्पर आणि मैत्रीपूर्ण मार्गाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या जीवनातील या स्थित्यंतरातून, आमच्या दोन मुलांचे कल्याण हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी आम्ही नम्र विनंती करतो". याआधी झूमने हेमा मालिनी यांनी या निर्णयात कोणताही हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त दिलं होतं. 

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "हेमा मालिनी मुलीच्या घटस्फोटाच्या निर्णयावर काहीच भाष्य करत नाही आहेत. ही ईशाची खासगी बाब असून त्यांची मध्यस्थी करण्याची इच्छा नाही. त्यांनी याआधी कधी ते केलेलं नाही. त्या सध्या मुलीसह असून, नेहमीच सोबत राहिल्या आहेत. पण ईशाच्या निर्णयात त्यांचा कोणताही सहभाग नाही"

ईशा आणि भरत यांच्यातील वादासंबंधी बोलताना सूत्राने सांगितलं आहे की, "गेल्या अनेक काळापासून हा वाद शिजत होता. ईशा आणि तिच्या पतीने फार आधीच हा निर्णय घेतला होता. फक्त ते हे जाहीर करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. आता ईशा पुढील आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत आहे". ईशा आणि भरतने 2012 मध्ये मुंबईत लग्न केले होते. ते राध्या आणि मिराया या दोन मुलींचे पालक आहेत. .