मुंबई : मराठी प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे ती 'बिग बॉस मराठी'ची. 15 एप्रिलपासून हा मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणार आहे. पण अद्याप या बिग बॉसच्या यादीत कुणाकुणाची वर्मी लागली आहे हे अद्याप कळलेलं नाही. बिग बॉस हा कार्यक्रम प्रत्येक भाषेत लोकप्रिय ठरला आहे. आता मराठीत हा प्रेक्षकांना किती भावतो हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहे. आतापर्यंत या बिग बॉस मराठीमध्ये कोण कोण कलाकार सदस्य म्हणून असणार हे अद्याप कळलेलं नाही. उषा नाडकर्णी यांच नाव आतापर्यंत समोर आलं आहे. मात्र अजून कुणाची नाव समोर आलेली नाहीत. असं म्हटलं जातं की जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा देवदत्त नागे या शोमध्ये असणार आहे अशी चर्चा आहे.
उषा नाडकर्णी या कार्यक्रमाचा भाग असल्याचे त्यांनी स्वतः टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्या सांगतात, मी बिग बॉस मराठीत स्पर्धक म्हणून जाणार आहे. या कार्यक्रमात माझ्या वयाचे कोणतेही स्पर्धक नाहीयेत. खरे सांगू तर या कार्यक्रमात जायला मला थोडीशी भीती वाटत आहे. बिग बॉसमध्ये तुम्हाला तुमच्या फोनशिवाय राहायला लागते. त्यामुळे अनेकांना आपण फोनशिवाय राहू शकतो का याचे टेन्शन असते. पण मला फोनची तितकीशी सवय नसल्याने मला तसे टेन्शन नाहीये.
‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात अभिनेता ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, गौरी सावंत या कलाकारांनी येण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरीही आता या घरात येणाऱ्या पहिल्या सेलिब्रिटीच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. आता यापुढे आणखी कुणाची नाव समोर येतात हे पाहणं देखील महत्वाच ठरणार आहेत.