या बॉलिवूड अभिनेत्रींची मोस्ट अॅडमायर्ड वुमेनच्या यादीत वर्णी!

बॉलिवूड अभिनेत्री जगभरात प्रसिद्ध असल्याचे सर्वच जाणतात.

Updated: Apr 12, 2018, 04:41 PM IST
या बॉलिवूड अभिनेत्रींची मोस्ट अॅडमायर्ड वुमेनच्या यादीत वर्णी! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जगभरात प्रसिद्ध असल्याचे सर्वच जाणतात. पण त्यांच्या लोकप्रियतेची पावती देणारी अजून एक खबर समोर आली आहे. यंदाच्या जगातील मोस्ट अॅडमायर्ड वुमेन च्या यादीत तीन बॉलिवूड अभिनेत्रींनी जागा पटकावली आहे. योगोव या आंतरराष्ट्रीय मॅगझिनने ३५ देशांतील सुमारे ३७ हजार लोकांच्या सर्वेक्षणानंतर ही यादी जाहीर केली आहे. 

मोस्ट अॅडमायर्ड वुमेनच्या यादीत या अभिनेत्री

मोस्ट अॅडमायर्ड वुमेनच्या यादीत ऐश्वर्याने ११ वे तर प्रियंकाने १२ वे आणि दीपिकाने १३ व्या स्थानावर कब्जा केला आहे. या यादीत अॅँजेलिना आघाडीवर आहे. तर मिशेल ओबामा दुसऱ्या आणि ओपरा विनफ्रे तिसऱ्या स्थानावर आहे.

तर पुरुषांच्या यादीत या भारतीयांचा समावेश

ही यादी फक्त महिलांची नाही तर मोस्ट अॅडमायर्ड मेन ही यादी देखील जाहीर झाली आहे. यात पहिल्या स्थानावर बिल गेट्स, दुसऱ्या स्थानावर बराक ओबामा आणि तिसऱ्या स्थानावर जॅकी चॅन यांनी कब्जा केला आहे. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत. तर पंतप्रधान मोदींनी नाव आठव्या स्थानी आहे.