अनुपम खेर की मनमोहन सिंग ? ओळखणं झालं कठीण

सोशल मिडियाच्या ताकदीला खुद्द अनुपम खेर यांनी दाद दिलीय. 

Updated: Apr 12, 2018, 04:37 PM IST

नवी दिल्ली : सोशल मिडियाच्या ताकदीला खुद्द अनुपम खेर यांनी दाद दिलीय. अनुपम खेर यांनी नुकतंच 'द अँसिडंटल प्राईम मिनिस्टर' या सिनेमातला आपला फर्स्ट लूक ट्विटरवरून शेअर केला होता. मात्र सध्या याच सिनेमातला अनुपम खेर यांच्या मनमोहन सिंग यांच्या भूमिकेतल्या लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होतोय. आणि अनेक जणांनी हा व्हिडिओ अनुमप खेर यांनाही शेअर केला...त्यामुळे हाच व्हिडिओ आपव्या ट्विटर अकांऊंटवर शेअर करत मी यूके मध्ये रिहर्सल करत असतानाचा हा व्हिडिओ कोणी तरी शूट केला आणि तो शेअर केला ....मला आनंद होतो असं म्हणत त्यांनीही हा व्हिडिओ शेअर केला. त्यावरून त्यांना अनेक प्रतिक्रीयांबरोबर अनेक लाईक्सही मिळत आहेत.