Vijay Verma On Dating: डार्लिंग्स ही फिल्म तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल आणि तुम्हाला या चित्रपटातील विजय वर्माचं कामही फार आवडलं असेलच. विजय वर्मा हा सध्या बॉलीवूड ओटीटीवरचा चेहरा झाला आहे. त्यानं पिंक या चित्रपटात केलेली भुमिकाही भरपूर गाजली. त्यानंतर ओटीटीवर आलेल्या अनेक वेबसिरिजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. (darlings fame actor vijay verma confesses about his dating life says the girls used to go violent against me)
हल्ली कलाकार आपल्या डेटिंग लाईफबद्दल खुलेआपपणे बोलत असतात. त्याचप्रमाणे अभिनेता विजय वर्मानंही आपल्या डेटिंग लाईफबद्दल खुलासा केला आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत त्यानं आपल्या डेटिंग अनुभवांमध्ये खुलासा केला होता. यापुर्वी विजय वर्माला पाकिस्तान, फ्रान्स आणि कॅनडामधून लग्नाच्या ऑफर्सही आल्या होत्या असा त्यानंच खुलासा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं जे सांगिलंय ते ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही.
मुलाखतीत बोलताना त्यानं सांगितलं की त्याला मुलींनी त्रासही दिला होता. हा त्रास म्हणजे जर त्यानं कुठल्याही गोष्टींसाठी पैसे खर्च केले तर त्याच्याविरूद्ध मुली हिंसक व्हायच्या. एका मुलीबद्दल त्यानं सांगितलं की एक मुलगी त्याला महिन्याला 5000 रूपये द्यायची.
या व्हिडीओमध्ये त्यानं सांगितलं की मुली त्याला बिलही भरू द्यायच्या नाहीत आणि तो बिल फाडून टाकायच्या. 'डार्लिंग्स' मध्ये, विजय आलियाच्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसला होता, ज्यात शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यू देखील होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. 'मिर्झापूर 3' व्यतिरिक्त, विजयचा सोनाक्षी सिन्हासोबतचा 'दहाड', करीना कपूर आणि जयदीप अहलावत यांच्यासोबतचा एक नेटफ्लिक्सचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.