मुंबई : आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट अभिनय आणि गायनानं लाखो हृदयांवर राज्य करणारी अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका ग्वेनेथ पॅल्ट्रोनं ( Gwyneth Paltrow ) 27 सप्टेंबर रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. ग्वेनेथला आपण सगळ्यांनी Iron Man या चित्रपटाच्या सीरिजमध्ये पेपर पॉट्स या भूमिकेत पाहिलं. ग्वेनेथनं तिच्या 50 व्या वाढदिवसाच्या आनंदात न्यूड फोटोशूट केलं आहे. यानंतर इंटरनेटवर जोरदाार चर्चा सुरु झाली आहे. ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीनं तिच्या जीवनशैलीबद्दलही अनेक गोष्टींचा खुलासा केला.
ग्वेनेथनं स्वतःपेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या ख्रिस मार्टिनशी लग्न केलं होतं. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यांची मुलगी ऍपल 18 वर्षांची आहे आणि मुलगा मोझेस 16 वर्षांचा आहे. टीव्ही निर्माता ब्रॅड फाल्चुकसोबत लग्नगाठ बांधणाऱ्या ग्वेनेथनं एक फोटोशूट केलं, ज्यामध्ये ती नग्न आहे आणि तिने स्वत:ला सोनेरी रंगात रंगवले आहे. अशा प्रकारे तिनं तिचा 50 वर्षांचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच ग्वेनेथनं प्रीमेनोपॉज आणि रजोनिवृत्तीबद्दलही सांगितलं. याबद्दल इतके टॅबू का आहेत हे तिनं सांगितलं. त्यासाठी मी तयार आहे. मी 26 वर्षांची मॉडेल नाही. मला असं आयुष्य ना चेहरा नकोय. मी माझं आयुष्य जगले आहे आणि माझ्या सुरकुत्या कमावल्या आहेत. दोन मुलांची आई 50 वर्षांची असल्याचे सांगणं सोपं होतं. (gwyneth paltrow goes nude at 50 says getting botox at 40 not good i was embarrassing know more )
वयाच्या ४० व्या वर्षी बोटॉक्स करणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. खरंतर वयाच्या 40 व्या वर्षी ग्लेनेथनं तिच्या चेहऱ्यावरली सुरकुत्या दूर करण्यासाठी बोटॉक्स केलं. ज्याचा ग्वेनेथला पश्चातार आहे. वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ग्लेनेथनं सांगितलं की, जेव्हा मी वयाच्या 30 शीत होते, तेव्हा माझ्यावर लग्न कर आणि त्यानंतर तुझी मूल असायला हवी असा दबाव घालण्यात आला. त्यावेळी मी कोणत्याही Serious Relationship नात्यात नव्हतो. लग्न न करून मी माझ्या पालकांना निराशा केले होते.
ग्वेनेथ यानंतर म्हणाली, 'जेव्हा तुम्ही तुमच्या वयाच्या 20 शीत असता, तेव्हा तुम्ही खरोखरच लहान असता. जेव्हा तुम्ही तुमची 30 शी पार करता तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही जीवनाचा ताबा घेण्यास सुरुवात करायला सुरुवात करता. पण जेव्हा मी माझ्या 40 शीत पोहोचले तेव्हा मी खरोखर घाबरले होते. माझी त्वचा पाहून मला भीती वाटली. त्यानंतर मी बोटॉक्स घेण्यासाठी डॉक्टरांकडे गेले. ते खरोखरच लाजिरवाणं होतं. म्हातारपणी असं करणं खरंच योग्य नव्हतं.
बोटॉक्स हे एक औषध आहे जे त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते. चेहऱ्याच्या ज्या भागात सुरकुत्या आहेत त्या भागात बोट्युलिनम इंजेक्शन दिलं जातं. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. याशिवाय, हे अनेक प्रकारे तुमचेचं सौंदर्य वाढवतं. सामान्यतः स्त्रिया वयाच्या 40 व्या वर्षी हे करू लागतात. एकदा बोटॉक्स दिल्यानंतर त्याचा प्रभाव तीन महिने राहतो. अमेरिका-ब्रिटन आणि भारतातही त्याची मागणी झपाट्याने वाढत आहे.