आदित्य रॉय कपूरसोबत अनन्याच्या रिलेशनशिपवर वडील चंकी पांडे यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले...

Chunky Panday on daughter Ananya Panday : अनन्या ही  चंकी पांडे यांची लेक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होत्या. त्यात आता चंकी पांडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 4, 2023, 05:43 PM IST
आदित्य रॉय कपूरसोबत अनन्याच्या रिलेशनशिपवर वडील चंकी पांडे यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले... title=
(Photo Credit : Social Media)

Chunky Panday on daughter Ananya Panday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यांचे ट्रिपचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या स्पेनच्या सुट्टीतील या फोटोंना पाहून प्रेक्षकांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर आणि आधी ते दोघे अनेकवेळा पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसले होते. आता पर्यंत आदित्य किंवा मग अनन्यानं त्यांच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं नाही. पण त्यांच्याविषयी काय गॉसिप सुरु याची कल्पना नक्कीच त्यांना आहे. याविषयी आता अनन्यांचे वडील चंकी पांडे यांना या विषयी विचारता त्यांनी जे उत्तर दिलं त्या उत्तरानं अनेक आश्चर्यचकीत झाले. 

चंकी पांडे यांनी स्पष्टपणे नाही पण त्यांनी इशारा देत सांगितलं की ते दोघं रिलेशनशिपमध्ये नाही. 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत चंकी पांडेनं अनन्या पांडेनं या अफवांवर सांगितलं की "जेव्हा आपण ग्लॅमरच्या जगात असतो तेव्हा अशा गोष्टी होत राहतात. तर या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. तुम्ही या सगळ्या गोष्टींना थांबवू शकत नाही." तर पुढे चंकी पांडे यांना अनन्याची जोडी कोणत्या कलाकारांसोबत आवडते याविषयी सांगितले. ते म्हणाले की मला अनन्याची ऑनस्क्रिन जोडी ही टायगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यनसोबत आवडते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चंकी पांडे यांना पुढे विचारण्यात आले की त्यांच्या मुलीला बॉयफ्रेंडविषयी काय सल्ला द्याल. त्यावर ते म्हणाले की जो पण असेल तो त्यांच्याहून चांगला असला पाहिजे. याविषयी बोलताना चंकी पांडे म्हणाला की मी म्हणालो की जो पण असेल तो माझ्या पेक्षा चांगला असला पाहिजे. तरच त्याला बॉयफ्रेंड बनव, नाही तर त्याहून कमी असेल तर थोडा पण चान्स नाही. 

कॉफी विथ करणमध्ये करणनं अनन्याला आदित्यच्या नावानं चिडवलं होतं. दोघे करणच्या दिवाळी पार्टीत पोहोचले होते. शोमध्ये करण जोहर म्हणाला होता की 'मी माझ्या पार्टीत पाहिलं...' याआधी तो काही बोलणार तितक्यात अनन्या म्हणते की 'नाही, नाही तू काही पाहिलं नाही.' त्यानंतर करण म्हणाला आदित्यचं नाव घेतलं. त्यानंतर अनन्या आणि आदित्य अनेक ठिकाणी एकत्र दिसू लागले.'

हेही वाचा : कमल हासनसोबत काम केलेल्या लोकप्रिय अभिनेत्याचा रस्त्यावर आढळला मृतदेह, भिक मागून जगायचा

अनन्याच्या कामाविषयी बोलायचं झालं तर आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांडिल्यनं केलं आहे. याशिवाय अनन्याकडे 'खो गए हम कहां' हे हा चित्रपट देखील आहे.या चित्रपटात आदर्श गौरव आणि सिद्धांत चतुर्वेदी आहे. याशिवाय ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे. 'Call Me Bae' या सीरिजमध्ये अनन्या लवकरच दिसेल