पोटच्या मुलीपासून दूर राहत अनुष्का हे कसलं काम करतेय? पाहून विराटलाही धक्का

अनुष्कानं एक मोठा निर्णय घेतला

Updated: Aug 30, 2022, 09:41 AM IST
पोटच्या मुलीपासून दूर राहत अनुष्का हे कसलं काम करतेय? पाहून विराटलाही धक्का  title=
chakda express bts video Anushka Sharma as jhulan goswami left virat kohli shocked

Anushka sharma : अभिनेत्री आणि निर्माती, अनुष्का शर्मा तिच्या कलेव्यतिरिक्त आणखी एका कारणासाठी ओळखली जाते, तो म्हणजे तिचा स्पष्टवक्तेपणा. मुद्दा कोणताही असो, अनुष्का त्यावर आपलं अगदी स्पष्ट मत मांडते. पटेल त्या गोष्टीला पाठींबा आणि न पटण्याचा गोष्टीचा समाचार घेणारी हीच अभिनेत्री गेल्या काही काळापासून कुटुंब, मुलगी या साऱ्याला प्राधान्य देताना दिसत आहे. 

कधी विराटसोबत भारतीय क्रिकेट संघासोबत एखाद्या दौऱ्यावर जाणं असो किंवा मग आणखी काही, पतीची साथही तिनं सोडलेली नाही. पण, एक असं कारण होतं ज्यामुळं तिला पती आणि लेकिपासून दुरावा पत्करावा लागाला होता.  (Anushka sharma Virat kohli)

लेकिच्या जन्मानंतर फिटनेसकडे लक्ष देत पुन्हा अनुष्कानं एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय़ म्हणजे झुलन गोस्वामी (jhulan goswami) या भारतीय महिला क्रिकेटपटूच्या बायोपिकमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारण्याचा. 

वाचा : ...तर विराटची बायको नाही, वहिनी झाली असती अनुष्का शर्मा

(Vamika) वामिका म्हणजेच लाडक्या लेकिला काही काळ दूरस ठेवत अनुष्कानं तिच्या करिअरवरही लक्ष केंद्रीत केलं. मोठ्या पडद्या वर झुलन साकारण्यासाठी तिनं जीव ओतला. प्रचंड मेहनत घेतली. क्रिकेटमधील बारकावे टीपत आपल्यातच एक खेळाडू तिनं तयार केली. (chakda express bts video Anushka Sharma as jhulan goswami left virat kohli shocked)

पाहता पाहता झुलनच्या व्यक्तीरेखेत अनुष्का इतकी एकरुप झाली, की तिला अनेकांनीच ओळखलंही नाही, पत्नीचं हे एक खेळाडू म्हणून झालेलं Transformation पाहून खुद्द विराट कोहलीलाही धक्काच बसला. 

 

नुकतंच अनुष्कानं सोशल मीडियाच्या माध्यमातून 'छकडा एक्सप्रेस' (chakda express) या चित्रपटातील बिटवीन द शॉट्सचा Video समोर आणला. एक खेळाडू म्हणून तिनं स्वत:ला किती बदललं आहे, याचा अंदाच हा अवघ्या काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून येत आहे. विराटही पत्नीची ही मेहनत पाहून थक्क झाला आणि त्यानं तिच्या पोस्टवर प्रतिक्रियाही दिली. 

अनुष्कानं या भूमिकेसाठी लेकिपासून काही क्षणांचा दुरावा पत्करला, ते म्हणतात ना 'कुछ पाने के लिये, कुछ खोना पडता है' ही ओळ इथे लागू होतेय, नाही का?