त्याने अनन्या पांडेच्या गालाचा चावा घेतला, आणि...

फोटोत दिसत आहे की अनन्या पांडेने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे

Updated: Nov 18, 2021, 01:24 PM IST
त्याने अनन्या पांडेच्या गालाचा चावा घेतला, आणि... title=

मुंबई : अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'लिगर' ( liger ) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आहे. अलीकडेच, या चित्रपटाचा निर्माता करण जोहरने घोषणा केली होती की, जगप्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन देखील यात दिसणार आहे.

आता अनन्या पांडेनेही त्याची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीने माईक टायसनसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही मजा करताना दिसत आहेत. या फोटोत माईक अनन्या पांडेच्या गालाचा चावा घेण्याची अ‍ॅक्टींग करताना दिसत आहे.

पण हा फोटो काढताना माईक टायसन तिच्या कानाजवळ ओरडत होता. यावेळी हा फोटो क्लिक कऱण्यात आला आहे.  पण काहींना असे वाटते आहे की माईक अनन्याच्या गालाचा चावा घेत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 

फोटोत दिसत आहे की अनन्या पांडेने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे आणि ती हसतानाही दिसत आहे. दोघेही  एकमेकांची कंपनी एन्जॉय करत आहेत. अनन्याने या फोटोमध्ये चित्रपट निर्माते आणि चित्रपटातील सहकलाकारांनाही टॅग केले आहे. अनन्या पांडेच्या या फोटोला काही तासांतच 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

अनन्या पांडे आणि माईक टायसनच्या या फोटोवर चाहत्यांनीही मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.

त्यानंतर ती 'पति पत्नी और वो' आणि 'खाली पीली' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. लवकरच तिचा साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबतचा 'लिगर' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.