100 कोटींच्या जवळ पोहचला 'बागी 2'

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रीलिज झालेल्या टायगर  श्रॉफच्या 'बागी 2' या चित्रपटाची बॉक्सऑफिसवरील घोडदौड सुरू आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 11 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट अवघ्या 5 दिवसातच 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे.  

Updated: Apr 4, 2018, 09:59 AM IST
100 कोटींच्या जवळ पोहचला 'बागी 2'   title=

मुंंबई : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रीलिज झालेल्या टायगर  श्रॉफच्या 'बागी 2' या चित्रपटाची बॉक्सऑफिसवरील घोडदौड सुरू आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 11 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट अवघ्या 5 दिवसातच 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे.  

 2018 ची दुसरी सर्वात मोठी विकेंड ओपनर   

 पद्मावत चित्रपटाचा पहिल्या दिवसांचा कलेक्शनचा रेकॉर्ड मोडत 'बागी 2' हा चित्रपट अव्वल ठरला आहे. पहिल्याच दिवशी 'बागी 2' या चित्रपटाने 25  कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 2018 च्या टॉप विकेंड ओपन फिल्ममध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे.  

 100 कोटींजवळ 'बागी 2'  

 30 मार्चला रीलिज झालेल्या 'बागी 2' या चित्रपटाने पाचव्या दिवशी 11 कोटींची कमाई केली आहे. बागी 2 चं एकूण कलेक्शन सुमारे 96.20 कोटी इतके झाले आहे.  'बागी २'च्या यशानंतर भावूक झाला टायगर श्रॉफ, शेअर केला व्हिडिओ

 करण जोहरने केले कौतुक  

 दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरनेही टायगर श्रॉफच्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले आहे.चाहत्यांना टायगर श्रॉफची स्टंटबाजी आणि दिशा पटनीसोबतची केमेस्ट्री भावली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.  

 

 काय आहे चित्रपटाची स्टोरी 

या चित्रपटात टायगर रणवीर प्रताप सिंग उर्फ रॉनीच्या भूमिकेमध्ये आहे. रॉनी या चित्रपटात कमांडो दाखवला आहे. तर नेहा(दिशा) रॉनीची कॉलेजमधली प्रेमिका आहे. नेहाचं लग्न दुसऱ्याबरोबर झाल्यावर ती रॉनीला ४ वर्षांनी भेटते. नेहा रॉनीला तिच्या किडनॅप झालेल्या मुलीला शोधण्यासाठी मदत मागते आणि चित्रपटामध्ये सगळी अॅक्शन सुरु होते.