श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या? बोनी कपूर यांचा जान्हवीशी संबंधित मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं मृत्यू कारण खुद्द त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी खुलासा केला आहे. त्यानंतर आता बोनी कपूर यांनी जान्हवीच्या जन्माबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 3, 2023, 02:01 PM IST
श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या? बोनी कपूर यांचा जान्हवीशी संबंधित मोठा खुलासा title=
Boney Kapoor on Sridevi being pregnant with Janhvi Kapoor before their marriage

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक निधनानंतर बॉलिवूडसह अख्खा जगाला हादरा बसला होता. दुबईमध्ये कुटुंबातील सदस्याच्या लग्नासाठी गेलेले श्रीदेवी भारतात परतलीच नाही. गेल्या पाच वर्षांपासून श्रीदेवी यांच्या मृत्यू नेमका कसा झाला. हा घातपात होता की निसर्गरित्या मृत्यू होता याबद्दल तर्क वितर्क लावली जात होती. पण आज खुद्द श्रीदेवी यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी खुलासा केला आहे. The New Indian ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्या रात्री काय झालं आणि श्रीदेवी यांच्या मृत्यू कशामुळे झाला याबद्दल सांगितलं आहे. (Boney Kapoor on Sridevi being pregnant with Janhvi Kapoor before their marriage)

 श्रीदेवी यांच्या मृत्यू हा क्रॅश डाएटमुळे झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी या मुलाखतीत श्रीदेवी आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत. बॉलिवूड जगतात कायम ही चर्चा होते की श्रीदेवी या लग्नापूर्वी प्रेग्नेंट होत्या. या अफवेवर अखेर बोनी कपूर यांनी चुपी तोडली आहे. जान्हवी कपूर हिच्याबद्दलचा मोठा खुलासा वडील बोनी कपूर यांनी केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

त्यांनी या मुलाखतीत सांगितलं की, लोकांना वाटतं श्रीदेवी लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या. खरंतर आम्ही दोघांनी लग्न केलं होतं आणि नंतर लग्नाबद्दल जाहीर केलं. तोपर्यंत श्रीदेवी गर्भवती असल्याचं दिसत होत्या. या मुलाखतीत बोनी कपूर यांनी दुसऱ्या लग्नाबद्दलही सांगितलं. ते म्हणाले की, माझं दुसरं लग्न हे श्रीदेवीसोबत शिर्डीत 2 जूनला झालं होतं. तिथे आम्ही एक रात्रही राहिलो होतो. त्यानंतर जानेवारी महिन्यात श्रीदेवी प्रेग्नेंट असल्याचं दिसून लागली. मग आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून आम्ही सर्वांसमोर लग्न केलं. 

खरं तर श्रीदेवीसोबत 2 जून 1996 मध्ये लग्न झालं होतं. पण लोकांसाठी आमचं लग्न हे जानेवारी 1997 मध्ये झालं आहे. त्यामुळे लोकांना वाटतं लग्नापूर्वी श्रीदेवी प्रेग्नेंट होत्या आणि जान्हवी ही लग्नाआधीचं आमचं मूल आहे. 

श्रीदेवी बोनी यांच्या करायच्या 'ही' गोष्ट!

पुढे बोनी कपूर म्हणाले की, त्यांचं संपूर्ण कुटुंब धार्मिक आहे. माझी पत्नी श्रीदेवी असो किंवा सुनिता म्हणजे अनिल कूपरची पत्नी किंवा माझी मुलगी जान्हवी आमचं संपूर्ण कुटुंब धार्मिक आहे. जान्हवी दर तीन महिन्यांनी तिरुपतीला जाते. तर माझी पत्नी श्रीदेवी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला पायी तिरूपतीला जायची. त्याशिवाय जेव्हा जेव्हा मला त्रास व्हायचा माझ्यासमोर अचडणी निर्माण व्हायच्या तेव्हा श्रीदेवी सिद्धिविनायकाकडे अनवाणी जात होत्या. 

आजही श्रीदेवी इथे आहे असं भासतं...

बोनी कपूर या मुलाखती श्रीदेवींच्या आठवणीत रमले होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, श्रीदेवी यांनी चेन्नईतील घर खूप आवडायचं. आजही तिथे गेल्यावर मला वाटतं की, श्रीदेवी त्यांच्यासोबत आहे. आजही त्या घरात श्रीदेवीचं अस्तित्व जाणवतं. त्या घरात पहिल्यांदा श्रीदेवीला पाहिलं होतं तो क्षणही आजही डोळ्यासमोर येतो.